मलायकाच्या फिटनेसचं रहस्य तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. ती ४६ वर्षांची असूनही, ती आपल्या आरोग्याची आणि त्वचेची खूप काळजी घेते. तिच्या फिटनेसबद्दल सांगायचे तर ती दररोज योग आणि व्यायाम करते. तिच्या चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी योग आणि व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. गेल्या काही दिवसांत, तिने नौकासन करत असतानाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. हे आसन करण्याचे फायदे..

१) नौकासनाची पद्धत
– सर्वप्रथम मोकळ्या हवेत आणि जमिनीवर मैट घालून पाठीवर झोपा.
– हळू हळू डोके आणि खांदे उंच करा आणि हात सरळ ठेवा.
– यानंतर पाय वरच्या बाजूस वर करताना दीर्घ श्वास घ्या.
– काही काळ या अवस्थेत राहिल्यानंतर सामान्य स्थितीत परत या. हे आसन पुन्हा करा.

२) नौकासनाचे फायदे
– पोट आणि कंबतेवरील जमा होणारी चरबी कमी करून वजन कमी होण्यास मदत होते.
– पचन तंत्र मजबूत करते, पोटाच्या समस्या दूर होतात.
– पाठीवर ताण पडून स्नायू आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
– हे आसन केल्याने हर्नियाच्या रुग्णांना फायदा होतो.
– एकाग्रता वाढते

या समस्या असल्यास नौकासन टाळा … –
– मायग्रेन, कमी रक्तदाब, पाठीच्या कणा या संबंधित समस्या असल्यास नौकासन करू नये.
– दमा आणि हृदयाशी संबंधित समस्या असल्यास हे आसन करण्याचे टाळा.
– पोटाच्या ऑपरेशननंतर काही दिवस हे आसन करणे टाळले पाहिजे.
– ज्या लोकांचे वय ५० किंवा त्यापेक्षा जास्त आहेत त्यांनी हे आसन करू नये.
– गर्भवती महिलांनी हे आसन टाळावे.

लक्षात ठेवा
– जे लोक प्रथमच हे आसन करत आहेत त्यांना आसन करणे कठीण होऊ शकते. सुरुवातीच्या काळात, भिंतीचा आश्रय घेऊन हे आसन करावे –
– सकाळी मोकळ्या हवेत आणि रिकाम्या पोटी हे आसन करावे
– शरीराचे सर्व वजन नितंबावर टाका
– सामान्य स्थितीत घेण्यास घाई करू नका. हळू हळू योग्य स्थितीत या.
– मासिक पाळीमध्ये 2 दिवस हे आसन करू नये.