अबब ! महाराष्ट्राला ‘भिकारी’ बनवेल असे भाषण करणार्‍या तानाजी सावंतांकडे ‘एवढी’ संपत्‍ती, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तानाजी सावंत यांनी भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चर्चा सुरु झाली ती त्यांच्या संपत्तीची. साखर सम्राट तानजी सावंत हे शिवसेनेला सर्वाधिक पक्षनिधी देणारे नेते म्हणून ओळखले जातात. तानाजी सावंत एकदा वादग्रस्त व्यक्तव्यात अडकले होते, तेव्हा ते म्हणाले होते की मी महाराष्ट्राला भिकारी बनवेल.

एका प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले होती की एका खरेदी व्यवहारांसंबंधित बोलताना, काही लोकांचा समज झाला असेल की तानाजी सावंत काय भिकारी बिकारी झालाय का ? मी महाराष्ट्रला भिकारी बनवेल पण तानाजी सावंत कधी भिकारी होणार नाही. यानंतर त्यांच्यावर झोडून टीका झाली होती.

याच महाराष्ट्रला भिकारी बनवेल असे म्हणणाऱ्या तानाजी सावंत यांच्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे समोर आले. त्यांची एकूण संपत्ती 180 कोटी 72 लाख एवढी आहे. शपथ पत्रातील 1 ते 9 अनुक्रमांत देण्यात आलेल्या माहितीनुसार सावंत यांच्याकडे जंगम मालमत्ता 127 कोटी 15 लाख, 83 हजार, 2019 रुपये आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे 31,73,900 रुपये एवढी जंगम मालमत्ता आहे. तर रोख रक्कम फक्त 50 हजार रुपये. ही रक्कम बँकेच्या ठेवी, शेअर्स, मालमत्ता भाडे, साखर कारखाने, गाड्या आणि दागिने यांच्या रुपात आहे. त्यांच्या स्थावर मालमत्ता शपथपत्रातील एक ते पाच अनुक्रमांकात सावंत यांच्याकडे 53,56,66,100 रुपयांची आहे. पत्नीच्या नावे 5, 68 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

सावंत यांच्यावर असलेले कर्ज विविध बँका आणि वित्तीय संस्था यांचे मिळून 11,66,45,693 रुपये आहे. तानाजी सावंत सध्या शिवसेनेचे विधानपरिषदेचेचे आमदार आहेत. तसेच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या या प्रकरणामुळे त्यांच्यावर विरोधीत पक्षातून चांगलीच टीकेची झोड उठवण्यात आली होती. यावर त्यांनी माफी मागत स्पष्टीकरण दिले की पूर्ण भाषण ऐकल्यावर मी काय बोललो याचा संदर्भ लक्षात येईल.

visit : Policenama.com