तुमच्या आरोग्याबद्दल खूप काही सांगतात तळपाय ! ‘या’ 9 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – पायाची बोटं किंवा तळपाय अनेक गंभीर आजारांचे संकेत देत असतात. परंतु याच्या लक्षणांकडं आपण जास्त लक्ष देत नाही. पायाच्या बोटांच्या नखांचा रंग बदलणं, पाय सुन्न होणं हे अनेक आजारांबद्दल तसेच हृदयाचं आरोग्य ठिक नसल्याचं दर्शवत असतं. अशाच काही लक्षणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) पाय थंड पडणं – पायामध्ये बल्ड सर्क्युलेशन ठिक नसेल तर अशी समसया येते. याच्या इतर कारणांबद्दल बोलायचं झालं तर अ‍ॅनिमिया, सतत थकवा, तंत्रिका तंत्र ठिक नसणं, मधुमेह, हायपोथायरायडिज्म आणि हायपोथर्मियासारख्या आजारांचाही समावेश होतो. तुम्ही यासाठी व्यायाम आणि योग करू शकता.

2) पायाच्या जॉईंट्समध्ये वेदना – तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही रुमेटाईड अर्थारायटीसनं पीडित आहात. परंतु ही समस्या वृद्धांमध्ये जास्त दिसते. यात अचानक वेदना होतात आणि काही काळानं आराम मिळतो. परंतु जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांसोबत संपर्क साधावा.

3) पायाच्या बोटांचे केस गळणे – तुमचं हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करत नाही तेव्हा असं होतं. पायाच्या बोटांपर्यंत रक्ताच्या माध्यमातून झिंक इत्यादी पोहोचू शकत नसल्यानं याच्या कमतरतेमुळं पायाच्या बोटांवरील केस गळू लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी भरपूर भाज्यांचं सेवन करा.

4) नखांचा रंग बदलणं – नखांमध्ये एखादं फंगल इंफेक्शन झाल्यानंतर असं होतं. काही स्थितीत हे त्वचेच्या रोगाचं लक्षणंही असतं. यासाठी तुम्ही पाय डेटॉलनं स्वच्छ धुवून त्यावर तेलाचे काही थेंब टाकले तर ही समस्या दूर होते.

5) पायांवर सूज – जास्त चालल्यानंतरही ही समस्या जाणवते. फायलेरिया या रोगाचंही हे लक्षण असू शकतं. यासाठी वेळ न घालवता लवकरच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

6) जखम लवकर न भरणं – पायाला झालेली जखम लवकर भरत नसेल तर हे डायबिटजचं लक्षण असू शकतं. यासाठी वेळीच डॉक्टांशी संपर्क साधायला हवा.

7) नख काळं होणं – काही लोकांचं नख पूर्णपणे काळं पडतं. फंगल टोनेल इंफेक्शनमुळं असं होतं. हे स्किन कॅन्सरचंही कारण ठरू शकतं. त्यामुळं याकडे दुर्लक्ष करू नका.

8) टाचांना भेगा – काही लोकांच्या पायाला जास्त भेगा असतात. कधी कधी त्यात जखमा होतात आणि रक्तही येतं. या स्थितीला हायपरकेरायटोसिस म्हटलं जातं. अशी समस्या असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

9) नखांवर लाल रेषा – नखांवर जर लाल रेषा दिसत असतील तर हृदयाशी संबंधित एखादं संक्रमण असण्याची शक्यता असते. या स्थितीत रक्ताच्या काही धमण्या तुटतात. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.