‘उद्धव बाळासाहेब ठाकरे – फोटोग्राफर ते मुख्यमंत्री’ !, जाणून घ्या प्रत्येक पैलू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडीचे नेते आणि शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार दि. 28 नोव्हेंबर) मुंबईतील शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मातोश्रींनीही उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. यावेळीही राज ठाकरेही उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनांनंतरही त्यांनी पक्षाची जबाबदारी एकहाती सांभाळली. शिवसेनेवरची आपली पकड त्यांनी कायमच मजबूत ठेवली आहे. निवडणूक कोणतीही असो मग ती ग्रामपंचायत असो किंवा लोकसभा असो शिवसेनेच्या यशाची कमान त्यांनी कायमच चढती ठेवली यात शंका नाही.

उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचा हा प्रवास तितकाच खडतर होता. शिवेसना पक्षप्रमुखासोबतच ते एक फोटोग्राफरही आहेत. ते कुटुंबवत्सल असून मितभाषी आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे उद्धव ठाकरे खूप मेहनती आहेत. सुसंस्कृत राजकारणी आणि कलाप्रेमी असणाऱ्या उद्धव ठाकरेंचा एक फोटोग्राफर ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे.

उद्धव ठाकरेंविषयी…

पूर्ण नाव – उद्धव बाळासाहेब ठाकरे
जन्म – 27 जुलै 1960
पत्नी – रश्मी ठाकरे
मुलं – आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे
आई – मीनाताई बाळ ठाकरे
वडील – बाळ केशव ठाकरे
शिक्षण – बालमोहन विद्यामंदिर आणि सर जे. जे. इंस्टिट्युट ऑफ अप्लाईट आर्ट
भाऊ – बिंदूमाधव ठाकरे आणि जयदेव ठाकरे. राज ठाकरे उद्धव यांचे चुलत भाऊ आहेत.
पक्ष – शिवसेना
आवड – फोटोग्राफी

‘असा’ आहे उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रवास

1) उद्धव ठाकरेंनी 1997 पासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली.

2) 2002 साली शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि पालिकेवर भगवा फडकवला.

3) 2003 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लोणावळ्यातील बैठकीत उद्धव यांची शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली.

4) 2004 मध्ये बाळासाहेबांनी उद्धव यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.

5) जून 2006 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत दैनिक सामनाचे ते संपादक राहिले.

6) उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची यशस्वी घोडदौड झाली.

7) शिवसेनेनं केलेली अनेक सामाजिक कामं त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम केलं.

8) 2007 साली त्यांनी विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मोहिमही राबवली.

9) 25 एप्रिल 2010 रोजी त्यांनी एनएसई संकुलात रक्तदानाचा महायज्ञ घडवून आणला. यामुळे देशात नवा विक्रम निर्माण झाला.

10) त्यांनी छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारला.

11) शिवसेनेच्या वतीनं त्यांनी 30 लाखांच्या औषधांचं वाटप केलं. इतकेच नाही तर मुंबईची त्यातही उपनगरातील आरोग्यसेवा बळकट ठेवण्यासाठीही त्यांनी अनेक योजना आखल्या.

12) मुंबईच्या मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी त्यांनी औषध पुरवठाही केला.

उद्धव ठाकरेंची प्रकाशित पुस्तकं पुढीलप्रमाणे-

1) गडकिल्ल्यांवर आधारीत पुस्तक- ‘महाराष्ट्र देशा’ (2010)
2) पंढरपूरच्या वारीवर आधारीत पुस्तक- ‘पहावा विठ्ठल’ (2011)

Visit : Policenama.com