कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे तिहेरी खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन 

शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबिक वादातून जावयाने सासू , मेव्हणी, पत्नी व मेव्हणा यांच्या वर लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्यामध्ये सासू, पत्नी व मेव्हणी जागेवर मृत झाले असून पत्नी व मेव्हणा यांना सांगलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात उपचार सुरु असताना पत्नीचा मृत्यू झाला. त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. कोल्हापूरात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे ही घटना घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48479c31-c927-11e8-8199-ffb10bfd1076′]

या प्रकरणी संशयित आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप हा फरारी असून पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केली आहेत. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात सासू छाया श्रीपती धुमाळ व मेहुणी सोनाली अभिषेक रावण, पत्नी रुपाली प्रदीप जगताप यांचा मृत्यू झाला.  मेहुणा रोहित श्रीपती धुमाळ हे जखमी झाले आहेत.

घोडेगाव येथे बिबट्याचा ७ जणांवर प्राणघातक हल्ला

प्रदीप जगताप हा मूळचा सांगली जिल्ह्यातील कवठे गुलंद गावचा आहे. इचलकरंजी पासून पाच किमी अंतरावर असलेल्या यड्राव गावात औद्योगिक वसाहत आहे. तेथील एका कापड प्रक्रिया गृहात तो काम करत होता. या गावातील शिरगाव चाळ येथे तो एकत्र राहात होता. त्याचे पत्नीसह कुटुंबियांशी सतत वाद होत असत. पहाटे त्याने घरात प्रवेश करून वाद घातला. सोबत आणलेल्या यंत्रमागाच्या लाकडी दांडक्याने त्याने बेधुंद मारहाण सुरू केली. त्याच्या या हल्ल्यात 3 ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले.

[amazon_link asins=’B011XO54NY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85817025-c927-11e8-9af2-d352dfbbc393′]

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे व उपअधीक्षक धीरज पाटील यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. पहाटे तीन वाजता हा प्रकार घडला पण आज सकाळी तो शेजारच्या लोकांच्या लक्षात आला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.