नववर्षाच्या पुर्वसंध्येला कॅब चालकाकडून TV अभिनेत्रीचा विनयभंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कलकत्ता शहरातील नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी महिला टेलिव्हिजन अभिनेत्रीचा छळ व विनयभंग केल्याप्रकरणी कॅब चालकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी ३ जानेवारी रोजी दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीने मंगळवारी रात्री १०० नंबर डायल करुन कलकत्ता पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली होती.

तसेच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी संबंधित टॅक्सी चालकास अटक केली.

या महिलेचा आरोप आहे की, उल्टाडंगा भागात टॅक्सीवर बसल्यानंतर टॅक्सी चालकाने ट्रिप रद्द केली. असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस अधिकारी म्हणाले की, ड्रायव्हर नशेत असल्याचा आरोपही त्या महिलेने केला असून तिने ड्रायव्हरला टॅक्सी थांबविण्याची विनंती केली परंतु त्याकडे ड्रॉयव्हरने दुर्लक्ष केले आणि टॅक्सी वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला.

तसेच ते म्हणाले की, “आम्ही चालकाला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/