घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांसह ४ जणांना अटक करुन १ लाख ७२ हजार २८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बग्गा उर्फ जुबेर रफिक शेख (वय -२० रा. शिवनेरी नगर कोंढवा, पुणे), छप्पन उर्फ मोहसीन अन्वर शेख (वय- २५ रा. शिवनेरी नगर कोंढवा, पुणे), एजंट उर्फ साहिल समीर कुरेशी (वय- २१ रा. शिवनेरी नगर कोंढवा, पुणे), आज्जू उर्फ नाजीम आयुब खान (वय- २४ रा. शिवनेरी नगर कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे १७ आणि १५ वर्षांच्या तीन अल्पवयीन साथिदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B071JWBFDT,B0119ROQXY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e4973011-af5e-11e8-8757-b988c0edb955′]

घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना कोंढवा पोलिसांना या घरफोडी करणा-या टोळीची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (एमएच १२ डीजी ३८८५) आणि चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

जाहिरात

चौकशी दरम्यान या टोळीने बिबवेवाडी आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून तीन घरफोडीच्या गुन्ह्यातील १ लाख ७२ हजार २८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जाहिरात

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग सुनील फुलारी, परिमंडळ – ५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार, पोलीस उप निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस हवालदार संजय कदम, राजस शेख, विलास तोगे, पोलीस नाईक योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, सुरेंद्र कोळगे, उमाकांत स्वामी, अमित साळुंके, अझीम शेख यांच्या पथकाने केली.