Kondhwa Pune Crime | सुपरवायझरचा चाकूने भोसकून खून, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kondhwa Pune Crime | इमारतीच्या कामावर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा चाकूने भोसकून खून (Kondhwa Murder) करत त्याला इमारतीवरुन खाली फेकून दिल्याचा प्रकार कोंढवा परिसरातील रहेजा स्टर्लिंग सोसायटीच्या (Raheja Sterling Society) क्लाऊड नाईन (Cloud 9 Kondhwa) जवळ घडला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज कुमारमोती कश्यप (वय- 35 रा. कृष्णानगर, गल्ली नंबर 2, मोहमदवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पंकज यांची पत्नी मीनाकुमारी पंकज कश्यप (वय-30) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.16) रात्री आठ ते साडे आठ दरम्यान घडला आहे. (Kondhwa Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महेश करंजकर यांनी नियंत्रण कक्षाला फोन करुन स्टर्लिंग सोसायटीच्या फेज सहा येथे एका 35 ते 40 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानुसार मार्शलद्वारे माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
प्राथमिक तपासात पंकज याचा धारदार हत्याराने भोसकून खून केल्याचे निष्पन्न झाले.
इमारतीच्या ठिकाणी तो सुपरवायझर म्हणून काम करत होता. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेटे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली