कोकणातील राजकारण तापलं ! राणेंच्या पैशाला खंडणीचा आणि खुनाचा ‘वास’ तर शिवसेनेचा ‘हा’ नेता ‘श्वान’ परंपरेतला ?

सिंधुदुर्ग / सावंतवाडी / पोलीसनामा ऑनलाईन – सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहत आहेत. सावंतवाडीचे राजकारण चांगलंच तापलं असून शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यानी नारायण राणेंसह भाजपाच्या इतर नेत्यांवर कडाडून टिका केली आहे. तसेच राणेंसह भाजपाच्या नेत्यांकडून सावंतवाडीच्या निवडणुकीत जो काही पैसा वापरला जाणार आहे त्या सगळ्या पैशाला खंडणीचा, खुनाचा आणि रक्ताचा वास आहे असा आरोप शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे.

तसेच केसरकर म्हणाले की प्रसंग पडल्यास भाजपाच्या इतर नेत्यांचीही कुंडली बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिला. केसरकरांच्या टीकेला पलटवार देत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले की केसरकर हे श्वान परंपरेतले आहेत. दरम्यान या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यातच निर्णायक लढत असून २९ डिसेंबरला याचा शेवट होणार आहे.

परिणामी, कोकण हा आधीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. असे असले तरी नारायण राणेंचा प्रभाव देखील कोकणात कमी नाही. त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार होण्याचे चिन्ह दिसतच आहेत. आणि विशेष म्हणजे शिवसेना भाजप युती तुटल्याने कोकणात राजकीय समीकरणं काहीशी बदलली आहेत. लोकसभेत नारायण राणे हे भाजपाच्या जवळ गेले होते तर विधानसभेत त्यांनी आपला स्वाभिमान हा पक्षच भाजपमध्ये विलीन करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे कोकणात खऱ्या अर्थाने लढत ही शिवसेना आणि राणे यांच्यात असणार आहे.

युती तुटल्यानंतरची ही पहिलीच लढत असणार आहे कारण विधानसभेला भाजप शिवसेना एकत्र लढले होते. कोकणातल्या राजकारणात केसरकर आणि नारायण राणे यांच्यात नेहमीच टीकेचे राजकारण झालेले आहे. आणि आता तर राणे कुटुंब भाजपात शामिल झाल्याने केसरकर आक्रमक झालेले आहेत. त्यांनी तीव्र टीका करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील हे स्पष्ट झाले होते कारण कणकवलीमध्ये भाजपाकडून नितेश राणे उमेदवार म्हणून रिंगणात होते. आणि भाजपा शिवसेना युती असतानाही शिवसेनेने कणकवलीत आपला उमेदवार उभा केला होता. आणि उद्धव ठाकरे प्रचारासाठी देखील तेथे गेले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/