Krishna Phal Benefits | कन्हैयाच्या नावाचे ‘हे’ फळ, गुणधर्माने अमृत समान, शुगरसह 5 आजारांसाठी रामबाण

नवी दिल्ली : Krishna Phal Benefits | कन्हैयाच्या नावाचे एक अनोखे फळ आहे. या फळाचे नाव आहे ‘कृष्ण फळ’. ते मिळणे थोडे कठीण आहे. कारण ते मोजक्याच ठिकाणी आढळते. ते गुणांमध्ये अमृत समान आहे. कृष्ण फळामध्ये पोषक तत्वे मुबलक असतात. ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरसारखे आजार कृष्ण फळामुळे बरे होतात (Krishna Phal Benefits).

यास इंग्रजीत पॅशन फ्रूट म्हणतात. कृष्ण फळ हे प्रामुख्याने ब्राझील, पॅराग्वे आणि अर्जेंटिनाचे आहे. मात्र, त्याची झाडे आता आशियाई देशांमध्ये लावली जातात. परंतु, शास्त्रात याचे वर्णन महाभारत कालीन आणि देशी फळ असे केले आहे. (Krishna Phal Benefits)

हे फळ खूप मौल्यवान आहे, त्याचे अनेक फायदे आहेत. १०० ग्रॅम कृष्ण फळांमध्ये २३ ग्रॅम कार्बोहाड्रेट, १० ग्रॅम डाएट्री फायबर, ११.२ ग्रॅम शुगर, २ ग्रॅम प्रोटीन, तसेच व्हिटॅमिन ए, आयर्न, पोटॅशियम, फोलेट सारखे घटक आढळतात.

कृष्ण फळाचे फायदे

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत, सिनियर डायटेशियन एन लक्ष्मी यांनी म्हटले आहे की, कृष्ण फळामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, पॉलिफेनॉल यांसारखे अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान रोखतात. फ्री रॅडिकल्समुळे अनेक क्रोनिक आजार होतात. कृष्ण फळ डायबिटीज, हार्ट डिसीज यांसारख्या आजारांपासून वाचवते. कृष्ण फळाचे फायदे जाणून घेऊया.

१. पचनासाठी उत्तम –

कृष्ण फळामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनशक्ती वाढवते. कृष्ण फळाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. पचन व्यवस्थित होते.

२. इम्युनिटी बूस्ट करते –

कृष्ण फळामुळे इम्युनिटी बूस्ट होते. यातील व्हिटॅमिन सी इम्युनिटीसाठी लाभदायक असते.

३. हार्ट हेल्थसाठी बेस्ट –

कृष्ण फळामध्ये सोडियम आणि हाय पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. सर्व हृदयाच्या आजारांपासून संरक्षण करते.

४. झोप सुधारते –

कृष्ण फळाच्या सेवनाने झोपेची गुणवत्ता सुधारते. यातील सेरोटोनिन आणि ट्रिप्टोफॅन सारखी संयुगे स्लीप हार्मोन्स सोडतात. यात अँटी-कॅन्सर गुणधर्म असल्याचे काही संशोधनात आढळून आले आहे.

५. डायबिटीजमध्ये रामबाण –

कृष्ण फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्याने ते खाल्ल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल संथ गतीने वाढते. यामुळे डायबिटीज रुग्णांसाठी ते लाभदायक आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने कार्बोहायड्रेट्सचा प्रभाव कमी होतो.

६. प्रेग्नंसीमध्ये लाभदायक –

एन लक्ष्मी यांच्यानुसार, कृष्ण फळाचे मर्यादित सेवन प्रेग्नंट महिलांसाठी खूप लाभदायक ठरते.
कारण त्यात आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्स, विशेषत: व्हिटॅमिन सी आणि फोलेट असते, ज्याची प्रेग्नंसीमध्ये जास्त गरज असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते’, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान (व्हिडीओ)

Chandrashekhar Bawankule | ‘फोडाफोडीचे संस्कार कुणाचे हे देशाला आणि…’, सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार

Bhau Kadam | भाऊ कदमचे झाले आहे ‘लव्ह मॅरेज’; आपल्याच विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला भाऊ, हटके लव्ह स्टोरी

Pune Crime News | पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परराज्यातील तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक;
58 लाखांचे मेफेड्रोन, हेरॉईन जप्त