कामाची गोष्ट ! KYC करण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरजच नाही, RBI नं बदलला सर्वात मोठा नियम, जाणून घ्या

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने केवायसी बाबतच्या नियमांची घोषणा आता केली आहे. व्हिडीओद्वारे बँक आपल्या ग्राहकांची केवायसी करू शकतात. रिझर्व बँक ऑफ इंडियाने मास्टर केवायसी गाईडलाईन्समध्ये सुधारणा केल्या आहेत. आता केवायसीची प्रक्रिया मोबाईल व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून केली जाऊ शकते. केंद्रीय बँकेकडून रेगुलेट केल्या जाणाऱ्या बँका, नॉन बँकिंग वित्तीय संस्था(NBFC), वॉलेट सर्व्हीस प्रोव्हाईडर्स आणि इतर वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी ही मोठा दिलासा देणारी बाब आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या ग्राहकांसाठी आता केवायसी करणे सहज होणार आहे. त्यांच्या खर्चातही यामुळे घट होणार आहे. याशिवाय केंद्रीय बँकेने आधार आणि इतर ई दस्तऐवजांच्या आधाराने ईकेवायसी आणि डिजिटल केवायसीचीही सुविधा दिली आहे.

…म्हणून सुरू केली ही सुविधा
आरबीआयने टाकलेल्या या पावलामुळे भारतीय बाजार त्या निवडक बाजारांमध्ये सामिल झाला आहे जिथे नियमांमध्ये सुधारणा करून व्हिडीओ केवायसीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय बँकेने व्हिडीओच्या आधारे कस्टमर आयडेंटीफिकेशन प्रोसेस (VCIP) यासाठी लागू केली जेणेकरून कस्टमर्सची ओळख पटवणं सोपं होईल.

ADV

असं होणार व्हिडीओ केवायसी
या तरतुदीनुसार, दुर्गम भागातील फायनान्शियल इंस्टीट्युशनचे अधिकारी पॅन, आधारकार्ड आणि काही प्रश्नांच्या आधारावर ग्राहकांची ओळख पटवू शकतात. एजंटने याची खात्री करणं गरजेचं आहे की, तो व्यक्ती देशातच आहे. यासाठी कस्टमरच्या जिओ लोकेशला कॅप्चर करावं लागेल.

जाणून घ्या अटी-
केवायसी व्हिडीओ कॉल गुगल ड्युओ किंवा व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या थर्ड पार्टी सोर्सवरून केला जाऊ नये. हा कॉल संबंधित बँकेच्या डोमेनवरूनच केला जायला हवा. तज्ज्ञ सांगतात की, व्हिडीओ केवायसी प्रोसेस सुरु करण्याआधी बँकांनी आपलं अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाईट लिंक करायला हवी. नोटीफिकेशननुसार, VCIPची प्रक्रिया आणि हे काम ट्रेन्ड अधिकाऱ्यांकडूनच केलं जावं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/