Lalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव, राज्य सरकारने जारी केली गाईडलाईन

मुंबई : Lalbaugcha Raja | कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त केला जात असतानाच मुंबईत यावेळी लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) दरबार भरणार आहे. लालबागमध्ये यावर्षी गणेश उत्सवाचे आयोजन केले जाईल, ज्यासाठी राज्य सरकारने रविवारी गाईडलाईन जारी (state government has issued guidelines) केली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, गणेश उत्सवाच्या आयोजनात कोविड प्रोटोकॉल (Covid protocol) बाबत कोणतीही शिथिलता असणार नाही.

कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षी लालबागमध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. येथे गणेश उत्सवाऐवजी ब्लड आणि प्लाझ्मा डोनेट कॅम्प लावण्यात आले होते, परंतु यावर्षी आयोजन होणार आहे.

लालबागच्या राजाची 4 फुटापेक्षा उंच मूर्ती नसणार

सरकारच्या गाईडलाईननुसार, लालबागमध्ये श्री गणरायाची मूर्ती 4 फुटापेक्षा जास्त उंच नसेल. सोबत जे लोक घरात गणपतीची मूर्ती स्थापन करतील ते 2 फुटापेक्षा जास्त उंच मूर्ती ठेवू शकत नाहीत.

याशिवाय आयोजनाच्या दरम्यान कोविड प्रोटोकॉलकडे विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. राज्य सरकारने आयोजकांना सांगितले आहे की, कोरोना संकट लक्षात घेता गणेशोत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा केला जावा. देशात गणेश उत्सवाची सुरूवात 10 सप्टेंबरपासून होईल.

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना लालबागचा गणेशोत्सव साजरा करणे
किती संयुक्तीक ठरेल असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढू
लागली आहेत. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये नवीन केस वेगाने वाढत आहेत. मागील 24 तासात
महाराष्ट्रात कोरोनाच्या साडेसहा हजार केस समोर आल्या आहेत.

हे देखील वाचा

India Post Payments Bank | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ‘या’ नियमात आजपासून होणार बदल; डोअरस्टेप बँकिंगसाठी मोजवे लागणार 20 रुपये

Atul Bhatkhalkar | अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले – ‘…त्यासाठी घराची कडी काढावी लागते’

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  lalbaugcha raja ganeshotsav celebration this year under govt guidelines

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update