जेव्हा नळातून अचानक पाण्यासारखी वाहू लागली रेड वाईन, कोणी मनभरेपर्यंत पिली तर कोणी बॉटल भरली (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इटलीतील एक गावात नळाला पाण्याऐवजी रेड वाइन आल्याने गावकरी हैराण झाले. या गावात नळातून लाईम ब्रुस्को स्पार्कलिंग रेड वाइन यायला लागली. बोलोगनाच्या जवळ असलेल्या एका गावात 4 मार्चला जेव्हा लोकांनी पाण्यासाठी नळ सुरु केला तेव्हा यातून रेड वाईन येण्यास सुरु झाली. जवळच्याच एका वाइनरीमध्ये बिघाड झाल्याने येथील पाण्याचा पुरवठा बंद झाला आणि नळातून वाइन येण्यास सुरुवात झाली. लोकांनी ही रेड वाइन फेकली नाही तर त्याचा वापर देखील केला.

काही स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर पाणी पुरवठ्याच्या सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले. तर काही असे होते की या घटनेने ते खुश झाले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, काही स्थानिकांनी नळातून येणारी ही रेड वाइन बाटल्यांमध्ये भरुन घेतली, जेणे करु ते ती जेवताना किंवा नंतर वापरु शकतील.

एका व्यक्तीने सांगितले की, मला माहिती नाही की हा एखादा पब्लिसिटी स्टंट आहे की ही खरंच समस्या आहे. आणखी एका व्यक्तीने सांगितले की मला अपेक्षा आहे की ही ज्याची जबाबदारी असेल तो याचा तपास करेल, तुम्ही यावर हसाल देखील परंतु ही काही छोटी बाब नाही. या घटनेनंतर वाइनरीने आपल्या फेसबूक पेजवरुन त्रस्त झालेल्या लोकांची माफी मागितली.