‘खोदा पहाड निकला चूहा’ ! लासलगाव पोलिसांकडून डझनभर अवैध दारू बाटल्या जप्त

लासलगाव – मुंबई येथून नव्यानेच पदभार स्विकारलेले नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताच जिल्ह्यामधील अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला. लासलगाव येथील संजय नगर व वाकद येथे लासलगाव पोलिसांनी छापा टाकून डझनभर अवैध दारू बाटल्या जप्त करून १२४८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये परिसरामध्ये अवैध दारूची विक्री होत असताना किरकोळ अवैद्य दारू पकडल्याने “खोदा पहाड निकला चूहा “या म्हणीला सार्थक करणारी अशी कारवाई झालेली आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारताच एका मातेच्या तक्रारीवरून अवैध दारू विक्री करणाऱ्यावर लासलगाव पोलीसा पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आले याप्रकरणी येवला तालुक्याचे पोलीस निरीक्षकांसह आठ जणांवर कारवाई करत मुख्यालय जमा करण्यात आले मात्र ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून लासलगाव येथील संजय नगर व वाकद येथे पोलिसांनी छापा टाकून १२४८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये परिसरामध्ये अवैध दारूची विक्री होत असताना चिटपुट कारवाई करत पोलीस अधीक्षकांच्या डोळ्यात धूळफेक केल्याची चर्चा पोलिस खात्यातच रंगली आहे .या दोन्ही घटनेप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे