मोबाईल चोरणार्‍याला लासलगाव पोलिसांकडून अटक

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन मोबाईलची चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात लासलगाव पोलिसांना अखेर यश आले असून या चोरट्याने चोरी केलेला रिअलमी ५ कंपनीचा मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी मोटार सायकल ताब्यात घेवुन सदर चोरट्याची सखोल चौकशी केली असता त्यांने लासलगाव शहरातुन मोबाईलची जबरी चोरी केली असल्याबाबत कबुली दिली आहे.

या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
लासलगाव पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरून ५१ / २०२० भादवि कलम ३९२ प्रमाणे दिनांक ३ मार्च २०२० रोजी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सहा पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे हे करीत होते.

सदर गुन्ह्याचा तपासाबाबत डॉ. आरती सिंह (पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण), शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण) व माधव रेड्डी (उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड) यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे गुप्त बातमीदारामार्फत मिळलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, परी.पोउनि अर्चना तोडमल, पो ना कैलास महाजन, पो कॉ प्रदिप आजगे, पो कॉ गणेश बागुल, पो कॉ देशमुख यांचे पथक तयार करून सदर पथकाने रेल्वे स्टेशन रोड लासलगाव ते टाकळी विंचुर रस्त्यावर सापळा रचुन संशयित इसम निशीकांत रमेश अहिरे (वय २२ वर्षे, रा.चंदनवाडी, टाकळी विंचुर, ता निफाड) यास ताब्यात घेतले असता या इसमाची अंगझडती घेतली असता, त्याचेकडे गुन्ह्यातील रिअलमी ५ कंपनीचा मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी मोटार सायकल ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी केली.

त्याने लासलगाव शहरातुन जबरी मोबाईल चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. या आरोपीस न्यायालयात हजर करून पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे.