लासलगाव परिसरातील 150 गोरगरीब कुटुंबे घेणार शीरखुर्माचा आस्वाद

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन  –  येथील दीडशेवर गरीब मुस्लिम कुटुंबियांचा रमजान ईदचा आनंदद्विगुणीत होणार आहे. या सर्व कुटुंबियांना शीरखुर्म्याचाही आस्वाद घेता येणार आहे. मॉर्डन फ्रेड सर्कल च्या वतिने पुढाकार घेऊन लॉकडाऊन च्या काळात कामगार,गोरगरिब कुटूंबांची होणारी अडचण लक्षात घेऊन लासलगाव परिसरातील नागरिकांना शीरखुर्मा चे साहित्य वाटप करण्यात आले

शीरखुर्मा या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थासाठी लागणारे काजू,बदाम,पिस्ते,शेवया,खोबरे,चारोली मगज,किसमिस,खसखस,वेलदोडे,कस्टर पावडर, खजूर व अन्य साहित्याचे दीडशे कीट या वर्षी गरीब कुटुंबांपर्यंत पोहचविण्यात आले असल्याची माहिती मॉर्डन फ्रेंड सर्कल चे मिरान पठाण यांनी या वेळी सांगितले त्यामुळे या कुटुंबांची रमजान ईद साजरी होणार आहे.

मुस्लिम धर्मियांमध्ये रमजान ईदचे विशेष महत्व आहे. महिनाभर उपवास (रोजा) केल्यानंतर ईदच्या दिवशी आनंदने साजरा केला जाते.शीरखुर्मा आस्वाद घेण्यासाठी आप्तेष्ट,मित्र परिवाराला आवर्जून घरी बोलावले जाते पण आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबांना रमजान ईद साजरा करण्यास अडचणी येतात.

कोरोना मुळे संकटकाळी मदत म्हणून लासलगाव परिसरा मध्ये गरजू व्यक्तींना शीरखुर्मासाठी खर्च करण्याची परिस्थिती नसलेल्या अशा कुटुंबांमध्येही ईद आनंदाने साजरी होण्यासाठी सुमारे दोनशे ते अडीच शे रुपये किमतीच्या या साहित्याचे दीडशेवर कीट यंदा लासलगाव परिसर मध्ये दिले गेले आहेत.रेल्वे स्टेशन परिसरात लासलगाव पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या हस्ते हे शीरखुर्मा चे साहित्य वाटप करण्यात आले

या प्रसंगी मौलाना महेमुद आलम,मिराण पठान,अझर शेख,जाकिर शेख,मंजूर शेख,मुन्ना कादरी,इमरान पठान,इमरान शेख,जमील शेख,शाम सालवे,अानिस पटेल,सिराज शेख,आरीफ पटेल,डॉ.नजीर शेख,राजू शेख,आसिफ पठान आदी उपस्थित होते