लासलगावला लवकरच मिळणार रुग्णवाहिका

लासलगाव – लासलगाव शहरातील सर्व समाजातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लासलगाव येथील मॉर्डन फ्रेंड सर्कल चे मिरान पठाण यांनी नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते हाजी रउफ पटेल यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.या वेळी नौशाद सय्यद,मुश्ताक भाई,अब्दुल शेख आदी उपस्थित होते

लासलगाव हे आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ मानली जाते.शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.सध्या कोरोना तसेच अन्य आजाराच्या रुग्णांना नाशिक तसेच इतर ठिकाणी उपचारासाठी जावे लागते अशा वेळी रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणात गरज भासते अश्या वेळेस येथील रुग्णांसाठी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी या हेतूने मिरान पठाण यांनी लासलगाव शहरासाठी एक रुग्णवाहिकेची मागणी हाजी रउफ पटेल यांच्या कडे केली आहे

हाजी रउफ पटेल यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत लवकरच लासलगावकरांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ असे आश्वासन या वेळी दिले.हाजी रउफ पटेल यांनी ईद ए मिलाद चे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यात आता पर्यंत १५ रुग्णवाहिकेचे वाटप केले आहे.या पंधरवड्यात सर्व शासकीय बाबींची पूर्तता करून लासलगाव साठी एक रुग्णवाहिका मिळणार असल्याचे मिरान पठाण यांनी सांगितले