Homeमनोरंजनअभिनेता इंदर कुमारच्या पत्नीनं अनेक आरोप करत केली करण जोहर आणि शाहरुख...

अभिनेता इंदर कुमारच्या पत्नीनं अनेक आरोप करत केली करण जोहर आणि शाहरुख खानची ‘पोलखोल’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. बॉलिवूड स्टार इंदर कुमार आज आपल्यात नाही. परंतु त्याची पत्नी पल्लवी कुमार हिनं आता या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत करण जोहर आणि शाहरुख खानबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत.

प्रायव्हेट इन्स्टा असणाऱ्या पल्लवीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा अनुभव सांगितला आहे. पल्लवीनं सांगितलं की, माझ्या पतीन स्वत:च्या जीवावर मालिकेत ओळख तयार केली होती. त्याला मोठ्या सिनेमात काम करायचं होतं. यासाठी आम्ही करण जोहरकडे गेलो होतो. मीही त्याच्यासोबत होते. सर्वकाही माझ्या समोर झालं. आम्हाला करणनं 2 तास वाट पहायला लावली होती.”

पल्लवी पुढे म्हणते, “आधी तर आम्हाला 2 तास वाट पहावी लागली नंतर त्याची मॅनेजर गरीमा आली आणि तिनं सांगितलं की, करण बिजी आहे. तरीही आम्ही त्याची वाट पाहिली. नंतर करण जेव्हा बाहेर आला तेव्हा तो म्हणाला की, इंदर तू गरीमाच्या टचमध्ये रहा सध्या तुझ्यासाठी काहीच काम नाही.”

पल्लवीनं सांगितलं की, “यानंतर 15 दिवसांनी इंदरनं फोन करून गरीमाला विचारलं तेव्हा त्याला तेच उत्तर मिळालं की, काम नाहीये. यांतर इंदरला ब्लॉक करण्यात आलं. जेव्हा इंदर झिरो सिनेमाच्या सेटवर शाहरुख खानला भेटायला गेला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की, त्याच्यासाठी काही काम नाहीये.

सर्वांना माहितीच आहे की, 28 जुलै 2017 रोजी इंदर कुमारं जगाचा निरोप घेतला. झोपेतच त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी असं सांगण्यात आलं होतं की, त्याला कार्डिएक अरेस्ट आला होता. हे सगळं झाल्यानंतर त्याचा एक व्हिडीओदेखील समोर आला होता ज्याततो तो आत्महत्या करायला जात असल्याचं बोलत होता. इंदरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं मासूम, तुमको ना भूल पाएंगे, वाँटेड, कहीं प्यार ना हो जाए अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News