250 रेल्वे स्थानकांवर ‘प्लॅटफॉर्म’ तिकिटांच्या दरात 5 पट ‘वाढ’, आता मोजावे लागतील 50 रुपये

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेत देशातील सुमारे २५० स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पट वाढ केली आहे. रेल्वेने तिकिटांची किंमत १० रुपयांनी वाढवून ५० रुपये केली आहे. कोरोना विषाणूमुळे स्थानकांवर गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. रेल्वेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की सहा प्रभागांमधील २५० स्थानकांवर या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर रेल्वे विभागातील स्थानकांचा समावेश आहे. गर्दी कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मध्य रेल्वेमध्ये नागपूर, मुंबई सीएसटी, भुसावळ, पुणे आणि सोलापूरचा समावेश आहे. पुढील आदेशापर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटचे हे दर लागू होतील. देशात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत. त्याचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व खबरदारीच्या उपाययोजना करीत आहेत.

तसेच भारतीय रेल्वेने अजून एक मोठे पाऊल उचलले आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railway) जाहीर केले आहे की आता ट्रेनमध्ये रेल्वेकडून ब्लँकेट देण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वेच्या पीआरओनुसार रेल्वे आता एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ब्लँकेट देणार नाही.

त्यांच्या मते दररोज ब्लँकेटची साफसफाई केली जात नाही, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान ब्लँकेट स्वत:साठी आणण्याची विनंती रेल्वेने केली आहे. तथापि, विभागाकडून सांगण्यात येत आहे की कोरोना विषाणूमुळे एसी कोचचे तापमान २५ डिग्री सेल्सियस ठेवले जाईल. जेणेकरून प्रवाशांना बोगीत ब्लँकेटची गरज भासू नये.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना रेल्वे कडून ब्लँकेट देण्यात येणार नाही. प्रवाशांनी आपल्या सोबतच घरून ब्लॅंकेट आणावीत. पश्चिम रेल्वेच्या पीआरओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की एसी कोचमध्ये आढळलेले ब्लँकेट दररोज साफ होत नाही. म्हणून प्रवाशांनी त्यांची ब्लॅंकेट स्वतः आणावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.