‘हजेरी’साठी ‘सही’ अन् ‘बायोमॅट्रीक’ची झंझट संपली ! आता चेहर्‍यावरून ‘अटेंडन्स’, Kent चं ‘स्पर्श’विरहीत ‘युनिक डिव्हाइस’ लॉन्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   वॉटर प्यूरीफायर ब्रँड केंट आरओने आपल्या आर्टिफिशियल इन्टेलिजन्स प्रॉडक्टचा विस्तार केला आहे. कंपनीने मागच्या वर्षी आपले एआय प्रॉडक्ट केंट कॅमआय लाँच केले होते. केंट आरओने आज भारतात केंट कॅमअटेंडन्स डिव्हाइस लाँच केले आहे. केंट कॅमअटेंडन्स सिस्टमची किंमत 25,000 रुपये आहे. यासोबतच क्लाऊड प्लॅटफॉर्मच्या वापराचा वार्षिक चार्ज यूजर्सला द्यावा लागेल.

ही एक नेक्स्टजेन टचलेस अटेंडन्स सिस्टम आहे, जी पूर्णपणे चेहर्‍याच्या ओळखीवर आधारित आहे. यामध्ये फेस स्कॅनने अटेंडन्स लागेल. हे कोविड-19 च्या काळात खुप उपयोगी ठरणार आहे. सध्या भारतात ऑफिस आणि करखाने उघडले जात आहेत. परंतु, अशावेळी उद्योगांसमोर आपल्या कर्मचार्‍यांची उपस्थिती नोंदण्याची मोठी समस्या आहे. यासाठी त्यांना बायोमेट्रिक अटेडन्स मशीनचा वापर करावा लागत होता, ज्यावर कोविड-19 नंतर प्रतिबंध लावण्यात आला आहे. अशावेळी हा डिव्हाइस चांगला पर्याय ठरू शकतो.

केंट कॅमअटेंडन्स डिव्हाइसमध्ये कर्मचार्‍यांची अटेंडन्स नोंदवण्यासाठी एआय आधारित कम्पुटर व्हिजनचा उपयोग केला आहे, ज्यामध्ये त्यांचा चेहरा ओळखून हजेरी लागेल. हे क्लाऊड अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून मॅनेज केले जाते, ज्यामध्ये कर्मचार्‍याचा पूर्ण रेकॉर्ड त्यांचा फोटो आणि डाटा ठेवला जातो, जो मॅनुअल अटेंडन्सच्या तुलनेत वेगवान आणि विश्वसनीय आहे.

केंटचे नवे प्रॉडक्ट डेटा आणि सर्व्हरसोबत भारतातच बनवण्यात आले आहे. याशिवाय, अनेक केंट कॅमअटेंडन्स उपकरणे एका परिसरात आणि विविध साईटवर लावता येऊ शकतात. सर्व केंट कॅमअटेंडन्स उपकरणांना केंद्रीय प्रकारे नियंत्रित करता येते. केंट कॅमअटेंडन्स उपकरणांतून डाटा सुद्धा ताबडतोब क्लाऊडवर येतो. कंपनी एचआर क्लाऊडवरून सर्व डाटा पाहू शकते आणि कर्मचार्‍यांची उपस्थिती नोंदवू शकते.