जगातील सर्वात लहान 3G मोबाईल ‘लॉन्च’, आकार पाहून व्हाल ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Zini Mobiles ने जगातील सर्वात लहान आकाराचा फोन Zanco tiny t2 लॉन्च केल्याने सर्व हैराण झाले कारण फोनचा आकार फक्त आंगठ्या एवढा आहे. हा फोन Zanco tiny t1 चे अपग्रेड वर्जन आहे आणि यात यूजर्सला कॅमेऱ्यासह एकून 14 फिचर उपलब्ध होतील. फोनला यूएस मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.

यूजर्स फोन कंपनीच्या अधिकृत वेबासाइटवरुन बुक करु शकतात. हा फोन 3G आहे. याशिवाय यात आणखी एक खासियत आहे ती म्हणजे या फोनद्वारे यूजर्स फोटोग्राफी करु शकतात. म्हणजे यूजर्स या छोट्याशा फोनद्वारे फोटो, व्हिडिओ शुट करु शकतात. फोनची किंमत $ 14,119 आहे.

फोनचे फिचर आणि स्पेसिफिकेशन 
फोनचा आकार पाहून तुम्ही विचार करत असाल की यात जास्त फीचर नसतील. परंतु यात व्हिडिओ रेकॉर्डिंग शिवाय मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे. यात यूजर्स 32 जीबीपर्यंत डाटा साठवू शकतात.

याशिवाय या फोनमध्ये एफएम रेडिओ, MP3 आणि MP4 फाइल्स, प्ले रेट्रो गेम्स, अलार्म क्लॉक आणि कॅलेंडर देखील आहे. तसेच यात सिक्युरिटीसाठी एसओएस फीचरची सुविधा आहे. तर फोनमध्ये टॉक अँण्ड टेक्स्ट फीचरच्या मदतीने यूजर्स फक्त बोलून मेसेज टाइप करु शकतात.

तर Zanco Tiny t2 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्यूल फ्रंट आणि रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकदा चार्ज झाल्यानंतर 6 तास हा फोन चालेल. तसेच याचा स्टॅंडबाय टाइम सात दिवसांचा आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/