Latur Crime | धक्कादायक ! पती म्हणून जुळ्या भावाने केली वहिनीबरोबर ‘मज्जा’, 6 महिन्यानंतर पर्दाफाश झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur Crime | लातूर शहरामध्ये धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. जुळे भाऊ (Twin Brothers) असल्याचा गैरफायदा घेऊन वहिनीवर (Sister in Law) बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये (Latur Crime) उघडकीस आली आहे. सगळ्यात भयंकर म्हणजे या घटनेनंतरही पतीसह, सासू-सासरे यांनीही या कृत्याला नैतिक ठरवत याची वाच्यता कुठेही न करण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

मागील वर्षी 20 वर्षाच्या तरुणीचा विवाह लातुर शहरातील (Latur Crime) रिंगरोड (Ring Road) परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत झाला. या तरुणाला एक जुळा भाऊ आहे. याचा गैरफायदा घेऊन दिराने भावजयसोबत अनैतिक संबंध (Immoral Relations) ठेवले. ही बाब सहा महिन्यानंतर विवाहितेच्या लक्षात आली. त्यानंतर या महिलेने ही बाब पती, सासू आणि सासरे यांना सांगितली. परंतु, याची वाच्चता कुठेही न करता याकडे दुर्लक्ष कर जसं सुरु आहे तसं सुरु ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. हे ऐकून विवाहितेला धक्का बसला.

त्यानंतर पीडित महिला माहेरी निघून गेली. तिला परत सासरी आणण्यासाठी दीर गेला असता तिने सासरी येण्यास नकार दिला. आई-वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली. मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आई-वडिलांना देखील धक्का बसला. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती, सासु-सासरे, दीर यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा (FIR) दाखल करुन जुळ्या भावांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलकांते (PSI Neelkante) करत आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे (Deputy Superintendent of Police Jitendra Jagdale) यांनी दिली.

Web Title : Latur Crime | twin brother raped on sister in law as husband shocking
revelation after 6 months latur crime

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त