निवडणूकीसाठी फेसबुकनं आणली ‘ही’ दोन फीचर्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीचा रंग चढला असातना त्यात भर पडली आहे ती म्हणजे सोशल मीडियीवरील प्रचाराची. मात्र, नुसता प्रचार काय कामाचा ? आता तुमच्या भागातील उमेदवार कोण, त्याची माहिती तुम्हाला घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी फेसबुकने दोन फिचर्स आणली आहेत.

फेसबुकच्या माध्यमातून तूम्ही आपल्या भागातील उमेदवाराची माहिती एका क्लिकवर मळवू शकता. फेसबुकने नुकतंच Candidate Connect आणि Share You Vote अशी दोन नवीन टूल्स लाँच केले आहेत. त्यात Candidate Connect या टूलवर तुमच्या भागातील लोकसभा उमेदवाराची सगळी माहिती मिळू शकते. बऱ्याच वेळा मतदारांना ही माहिती नसल्यानं नोटा हा पर्याय निवडला जातो. Share You Vote या दुसऱ्या टूल्सद्वारे लोकांना मतदानाच्या दिवसांची माहिती दिली जाणार आहे.

फेसबुक ओपन केल्यानंतर सेटिंग्जमध्ये बुकमार्क ऑप्शन किंवा न्यूजफीडमधून एका मेसेजद्वारे या टूलचा अॅक्सेस दिला जाऊ शकतो. त्यात २० सेकंदाचा एक व्हिडिओ असणार आहे. व्हिडीओ ओपन केल्यावर उमेदवार व त्याची माहिती, निवडणूक जिंकल्यावर त्याचे पुढचे ध्येय काय असेल इत्यादी माहिती दिली जाणार आहे.

मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी फेसबुकने हे नवीन फीचर आणले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मतदानासाठी लोकांना प्रेरित करणं हा Share You Vote या मोहिमेचा हेतू आहे. मतदान करणाऱ्यांना त्यांचे फोटो फेसबुकवर शेअर केल्यानंतर फेसबुकद्वारे तुमच्या फ्रेंडलिस्टमधील फोटोंसोबत एक व्हिडिओ तयार करून तुमच्या वॉलवर अपलोड केला जाईल. तो व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. हे फीचर १२ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुमच्या भागातील उमेदवार कोण आहे? हे घरबसल्या तुम्हाला एका क्लिकवर कळणार आहे.