पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या बिबट्याचा तिघांवर हल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या बिबट्याने तीन गुराख्यांवर हल्ला केला केला. महेरगाव ते बोरीस गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जंगलाजवळ हा हल्ला झाला. अनिल दिलीप अहिरे (28), मधुकर झुलाल पाटील (65), संदीप सुभाष भामरे (32) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने लवकर बिबट्याला बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

शासन पाणी योजनेसाठी लाखो रुपये निधी खर्च करत आहे. मात्र, उन्हाळ्याच्या सुरवातीच्या दिवसांतच जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. तलाव, लहान तळी अटली आहेत. त्यामुळे पाण्यासाठी वन्यजीवांना भटकंती करावी लागत आहे.

पुर्वी वन्य जीवांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागु नये यासाठी कृत्रीम पाणतळे तयार करुन त्यात टँकरने पाणी टाकले जात असे. परंतु याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने. ह्या घटना घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या हल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक बिबट्याच्या भितीने शेतामध्ये जाण्यासही घाबरत आहेत. त्यामुळे वन विभागाने तातडीने बिबट्याला पकडावे अशी मागणी परिसरातील गार्मस्थांकडून करण्यात येत आहे.

Loading...
You might also like