विमानात एकटी प्रवास करणाऱ्या ‘दिव्यांग’ मुलीला एअर होस्टेसचं पत्र, झालं सर्वत्र ‘कौतुक’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – विमानसेवेदरम्यान एअर होस्टेस प्रवाशांच्या मदतीसाठी उपलब्ध असतात. शक्य त्या प्रकारे सर्वतोपरी मदत त्या ग्राहकांना पुरवत असल्याने प्रवाशांचा प्रवास सहज आणि सुखकर होण्यास मदत होत असते. एअर होस्टेस ने केलेल्या एका अशाच कामाची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील विमानात प्रवास करणाऱ्या मूकबधिर मुलीला एअर होस्टेसने लिहिलेली चिठ्ठी व्हायरल झाली आहे. लोक त्या एअर होस्टेसचे खूप कौतुक करीत आहेत.

दरम्यान, १६ वर्षीय अ‍ॅशले ओबर प्रथमच विमानाने एकटी प्रवास करत होती. ती न्यूयॉर्कमधील बाल्टीमोरहून रोचेस्टरकडे जात होती. म्हणून, ती थोडी काळजीत होती. हे पाहून डेल्टा फ्लाइट ची अटेंडंट जना हिने अ‍ॅशलेयांना एक पत्र लिहिले. या पत्रात जनाने अ‍ॅशले उड्डाण आणि सुरक्षिततेबद्दल वाटणाऱ्या काळजीबद्दल लिहीत तिच्या मनातील सर्व प्रश्नांचे निरसन करणारा मजकूर लिहिला. जान यांनी पुढे असेही लिहिले आहे, ‘की जर तिला काही प्रश्न विचारायचा असेल तर किंवा काही हवे असेल तर मोकळ्या मनाने कळवावे.’

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार , जनाच्या या चिठ्ठीनंतर अ‍ॅशले ला खूप आनंद झाला आणि तिने आपला प्रवास पूर्ण केला. भेटीनंतर तिने तिच्या भाषेत सांगितले की मी अत्यंत चिंताग्रस्त होते. मात्र अशा वेळी जनाकडून अशी चिठ्ठी मिळाल्याने मला अत्यंत आनंद झाला. या प्रकारची सहानुभूतीपूर्वक मदत मी यापूर्वी कधी अनुभवली नव्हती.

अ‍ॅशलेच्या आईने मुलीचा अनुभव ऐकून ही चिठ्ठी ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यांनी फ्लाइट अटेंडंट जना आणि विमान कंपनी डेल्टाचे कौतुक केले आहे. यानंतर ही नोट(चिठ्ठी) प्रचंड व्हायरल होत आहे.

अ‍ॅशले यांचा अनुभव सांगत उड्डाण कंपनी एजन्सी डेल्टा यांनीही ग्राहकांना सर्वतोपरी उत्तम सुविधा पुरवण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी विमानसेवेच्या वैचारिक आणि सर्जनशील दृष्टिकेनाच आम्हाला अभिमान वाटत असल्याचे सांगितले आहे.