LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये करा एकदाच गुंतवणूक अन् मिळवा महिन्याला तब्बल 35 हजार रूपये पेन्शन, आयुष्यभर मिळेल फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एलआयसीचा एक पेन्शन प्लॅन खुप खास आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला पैसे जमा केल्यानंतर ताबडतोब पेन्शन मिळण्यास सुरूवात होते. या पॉलिसीचे नाव ‘जीवन शांती’ आहे. या पॉलिसीत गुंतवणूक करून व्यक्ती आयुष्यभर मासिक पेन्शनची व्यवस्था करू शकतो. याद्वारे व्यक्ती आपल्या निवृत्तीनंतरचा खर्च सहज पूर्ण करू शकतो. या पॉलिसीत ग्राहकांला एकरकमी पेमेंट करावे लागते आणि तो ताबडतोब पेन्शनचा लाभ मिळवू शकतो. एलआयसीच्या या योजनेला लाभ किमान 30 वर्ष व कमाल 85 वर्षापर्यंतची व्यक्ती घेऊ शकते. लोन, पेन्शन सुरू झाल्यानंतर 1 वर्षानंतर आणि सरेंडर, पेन्शन सुरू झाल्यानंतर 3 महिन्यानंतर करता येते.

पॉलिसी घेताना पॉलिसी धारकाजवळ पेन्शनसाठी दोन पर्याय असतात. पहिला इमिजिएट आणि दूसरा डेफ्फर्ड एन्युटी. इमिजिएटचा अर्थ पॉलिसी घेतल्यानंतर ताबडतोब पेन्शन तर डेफ्फर्ड एन्युटीचा अर्थ आहे पॉलिसी घेतल्यानंतर काही काळानंतर (5, 10, 15, 20 वर्ष) पेन्शन मिळणे सुरू होते. इमिजिएट एन्युटीमध्ये 7 ऑपशन मिळतात. तर डेफर्ड एन्युटीमध्ये दोन प्रकारचे पर्याय असतात ज्यामध्ये सिंगल लाइफसाठी डेफर्ड एन्युटी आणि दुसरा जॉईंट लाइफसाठी डेफर्ड एन्युटी आहे. जर त्याने या सात पयार्यांपैकी अ म्हणजे इमिजिएट एन्युटी फॉर लाइफ (प्रति महीना पेन्शन) निवडल्यास त्यास अशाप्रकारे गुंतवणूक करून रिटर्न मिळेल.

या पॉलिसीत एकरकमी गुंतवणूक करून तुम्ही 35 हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळवू शकता. ही पेन्शन तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील. यासाठी तुम्हाला ‘अ’ म्हणजे इमिजिएट एन्युटी फॉर लाइफ (प्रति महीने पेंशन) पर्याय निवडावा लागेल. यासोबतच तुम्हाला एकुण 6617000 रुपयांचा सिंगल प्रीमियम भरावा लागेल. जाणून घेवूयात या द्वारे 35 हजार रुपये पेन्शन कशी मिळते :

वय : 46
सम अश्युर्ड : 6500000
एकरकमी प्रीमियम : 6617000

पेन्शन :
वार्षिक : 437450
अर्धवार्षिक : 214825
तिमाही : 106519
मासिक : 35263

समजा एखादा 46 वर्षांचा व्यक्ती ऑपशन ‘अ’ म्हणजे प्रति महिना पेन्शनचा पर्याय निवडतो, सोबतच तो 65 लाख सम अश्युर्ड पर्याय निवडत असेल तर त्यास 6617000 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. या गुंतवणुकीनंतर त्यास प्रति महिना 35263 रुपयांची पेन्शन मिळेल. ही पेन्शन जोपर्यंत पॉलिसी धारक जिवंत आहेत, तोपर्यंत मिळेल. तर मृत्युनंतर ही पेन्शन येणे बंद होईल.