कामाची गोष्ट ! घरबसल्या Aadhaar कार्डला मोबाईल नंबर लिंक करा, जाणून घ्या फक्त काही मिनिटांची प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने मोबाइल नंबर बदलला जातो. परंतु यामुळे बँक खाती, लाईट बील आणि आधार कार्डला जुना नंबर दिलेला असतो. तो बदलला नसल्यामुळे धावाधाव करावी लागते. प्रत्येक बँकेत जाऊन नवीन अर्ज देऊन नंबर लिंक करावा लागतो. तसेच आधारचे देखील आहे. मात्र, आधारसाठी तुम्हाला कुठे अर्ज करावा लागत नाही. तुम्ही घरबसल्या तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करू शकता.

आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक ऑफलाइन आणि दुसरी ऑनलाइन. मात्र ऑफलाईनसाठी जवळचे आधार केंद्र किंवा पोस्टात जाण्याची आवश्यकता नाही. सध्या कोरोनाच्या काळात पोस्टात जाणे धोक्याचे आहे. गर्दी टाळून रांगेत उभे राहून काम करणे जिकिरिचे आहे. त्यामुळे सध्या तरी दुसरा पर्याय म्हणजे ऑनलाईनचा पर्याय चांगला आणि सोयीचा आहे. ऑनलाईन पद्धतीचा वापर करून तुम्ही घर बसल्या आधार आणि मोबाईलनंबर लिंक करु शकता. मोबाइल नंबर तपासणीसाठी वन टाईम पासवर्ड (ओटीपी) प्रणालीचा वापर केला जातो. ओटीपीच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

या स्टेप फॉलो करा
– तुमच्या मोबाइल नंबरवरून 14546 डायल करा.
– आता भारतीय किंवा एनआरआय या पर्यायाची निवड करा.
– यानंतर 1 आकडा दाबून तुमच्या फोन नंबरशी आधार कार्ड लिंक करण्याची परवानगी घ्या.
– आता तुम्ही 12 आकडी आधार नंबर नोंदवा आणि 1 दाबून आधार नंबर पूर्ण नोंदवल्याची खात्री करा.
– यानंतर तुमच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.
– आता तुम्हाला तुमचा फोन नंबर नोंदवावा लागणार आहे.
– UIDAI च्या डेटाबेसमधून तुमचे नाव, फोटो आणि जन्म तारीख घेण्यासाठी ऑपरेटरला परवानगी देण्यास सांगितले जाते.
– यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे ओटीपी मिळेल. त्याची नोंदणी करावी लागेल.
या टिप्स फॉलो केल्यानंतर तुमचा नवीन नंबर आधार लिंक झाला. हे पूर्ण करण्यासाठी 1 आकडा दाबावा लागणार आहे.