‘बेपत्ता’ झालेले पी. चिदंबरम काँग्रेस कार्यालयात दाखल ; कोणत्याही क्षणी अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातूनही दिलासा न मिळाल्याने ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम कालपासून गायब झाले होते. आज (बुधवारी) सायंकाळी ते नवी दिल्ली येथील काँग्रेस कार्यालयात हजर होऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण पळून गेलो नव्हतो तर मी माझ्या वकिलांसोबत लढण्याची तयारी करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अत्यंत नाट्यमय रित्या चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना धक्का दिला आहे. ते काँग्रेस कार्यालयात असल्याचे समजताच सीबीआय पथक त्या ठिकाणी जाऊन त्यांना अटक करू शकते.

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचे पी. चिदंबरम यांनी सांगत आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. तसेच माझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोपपत्र दाखल नसल्याचे सांगत मी आणि आपला मुलाने कोणताही गुन्हा केला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाच मिनीटाच्या या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांवर लक्ष वेधले.

आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात अडकलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडूनही दिलासा मिळालेला नाही. चिदंबरम यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई शुक्रवारी सुनावणी करणार आहेत. त्यामुळे चिदंबरम यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच ईडी आणि सीबीआयनेही चिदंबरम यांना नव्याने लुकआऊट नोटीस जारी करून त्यांना भारताबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त