भाजप खासदाराच्या कार्यालयासमोरील बॉम्बहल्ल्याचे Live Visuals, धार्मिक तेढ निर्माण करणारी केली होती पोस्ट (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या ट्विटमुळं मोठा गदारोळ झाला आहे. भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्यावर पश्चिम बंगाल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी त्यांनी ट्विट केलं होतं की, एका विशिष्ठ धार्मिक समुदायानं पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद भागातील काली मातेचं मंदिर नष्ट केलं आणि मंदिरातील मुर्ती जाळली आहे. या ट्विटनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता त्यांच्या कार्यालयाबाहेर बॉम्बहल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यात खासदारानं आरोप केला आहे की, त्याला जीवे मारण्यासाठी त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितले की, 25 बॉम्ब फेकण्यात आले होते. सीआयएसएफनं माझा जीव वाचावला नाहीतर मी जगू शकलो नव्हतो.

भाजप खासदार अर्जुन सिंह यांचा दावा मुर्शिदाबाद येथील काली मंदिराच्या व्यवस्थापकानं फेटाळला आहे. मंदिराचे सचिव शुकदेव वाजपेयी म्हणाले की, या भागात हिंदू आणि मुस्लिम लोक खूप शांततेनं राहतात. इथं कोणताच वाद नाही. या घटनेतून काही लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

खासदाराच्या ट्विटला उत्तर देतानाच मंदिर व्यवस्थापकानं सांगितलं की, सत्य न तपासताच वैयक्तीक रुपात ट्विट करू नये.

या सगळ्यानंतर मुर्शिदाबाद पोलिसांनी खासदाराविरोधात फेक न्यूज पसरवण्याचा गुन्हा दाखल केला आहे.