जादू नाही, सत्य… बँक लॉकरमध्ये ठेवलं होतं सोनं, उघडलं तर निघाले दगडं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जर आपण आपले सोने सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले असेल आणि काही वर्षांनंतर ते दगड बनले तर.. ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातही असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका व्यक्तीने पाच वर्षापूर्वी एका बँकेच्या लॉकरमध्ये आपले सोने ठेवले होते पण जेव्हा लॉकर उघडला तेव्हा त्यात दगड निघाले. परिसरातील टिळक गेट येथील एसबीआय बँकेतून हे प्रकरण समोर आले आहे. या बँकेत ठेवलेले सर्व सोन्याचे दगडात रुपांतर झाल्याने जलोर शहरातील रहिवासी पारसमल जैन चकित झाले.

पारसमल जैन यांचा महाराष्ट्रातील भिवंडी येथे व्यवसाय आहे. लॉकडाऊनमुळे 20 दिवस आधीच ते जलौरला परतले होते. यानंतर त्याने बँकेत जाऊन त्याचे लॉकर उघडले. लॉकर उघडल्यावर पारसमल जैन यांना असा धक्काच बसला, त्या लॉकरमध्ये सोन्याऐवजी दगड होते. परसमल यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार त्याने सुमारे 800 ग्रॅम सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. पण आता त्यात दागिन्यांऐवजी संगमरवरी दगडाचे तुकडे सापडले आहेत. या घटनेनंतर बँक प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

यानंतर पारसमल यांनी प्रथम बँकेचे व्यवस्थापक राम दीन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्वरित प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी त्याच वेळी बँकेच्या इतर अधिकाऱ्यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. आणि अखेर त्यांनी कोतवाली पोलिस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटना सांगत गुन्हा दाखल केला. दरम्यान, जेव्हा हे प्रकरण चिघळले, तेव्हा बँक व्यवस्थापकाने सांगितले की, आमच्या चेंबरमधून जेव्हा लॉकर ऑपरेट झाले, तेव्हा त्यांची सही व्यवस्थित जुळली. ते म्हणाले की, सर्व प्रक्रियेनंतर बॅंकेचा अधिकारी लॉकर उघडण्यासाठी सोबत गेला आणि लॉकरसुद्धा बरोबर होता. हे लॉकर ग्राहकांकडून ऑपरेट केले जाते. मॅनेजर म्हणाला की, जेव्हा तो चेंबरमध्ये बसला असता तेव्हा त्याने फक्त दगड मिळवण्याविषयी बोलले. लॉकरची चावी ग्राहकाकडे आहे, ग्राहक सोडून इतर कोणीही लॉकर उघडू शकत नाही. बँकेकडे फक्त मास्टर की आहे, सर्व लॉकर तळापासून लॉक आहेत.

दुसरीकडे कोतवाली पोलिस स्टेशनचे अधिकारी बाग सिंह म्हणाले की, तक्रारीनुसार पारसमलने पाच वर्षांपूर्वी लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. ज्यातून आता दगड सापडले आहेत. दिलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मध्यंतरी लॉकर उघडले नसल्याचे बँक अधिकारी सांगत आहेत तर ग्राहकांनी तक्रार दिली आहे. आजूबाजूच्या भागात या प्रकरणाची बरीच चर्चा होत आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता पाहून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.