Lockdown : लॉकडाऊनमुळं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍यामध्ये देखील ‘प्रॉब्लेम’, पुढं…

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  घरच्यांचा विरोध झुगारून अखेर ती मुंबईहून पुण्यात त्याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागली, सुरुवातीचे दिवस अगदी मजेत गेले , मात्र लोकडाऊन मुले सतत एकत्र राहिल्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले आणि ते विकोपाला देखील गेले. त्याने तिला मारहाण देखील केली.

पुण्यात तिची तरुणांबरोबर ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले. लॉकडाऊन मध्ये सतत एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यात छोट्या मोठया कारणावरून खटके उडत गेले. शेवटी तरुणीला तरुणाच्या बदललेल्या स्वभावाची भीती वाटू लागली. हा १ दिवस आपल्याला संपवेल या भीतीने तिने पोलिसांशी संपर्क करून घडलेल्या घटनेबद्दल सांगितले, तरुणीने मुंबईला घरी आई वडिलांकडे जाण्यासाठी पास देण्याची विनंती केली. पोलीस उपयुक्त बच्चन सिंग यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तरुणीला मुंबईला जाण्यासाठी पास देऊ करून तिची मुंबईला जाण्याची व्यवस्था देखील केली.