राज्यातील Lockdown च्या नियमांत शिथीलता ! सिनेमा हॉल, नाटयगृहे आणि योगा क्लासबद्दल ठाकरे सरकारची मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता हळू-हळू राज्य सरकार लॉकडाऊन(Lockdown)च्या नियमांमध्ये शिथिलता आणत आहेत. 5 नोव्हेंबरपासून सिनेमा हॉल 50 टक्के आसनक्षमतेवर सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळे सिनेरसिकांना त्यांच्या आवडीचे सिनेमे चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहेत. त्याचबरोबर नाटयगृहे देखील आता खुली होणार आहेत.

योगा क्लास तसेच इनडोअर स्पोर्टस गेम्स यांना देखील राज्य सरकारनं सूट दिली आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील ठिकाणी हे सर्व सुरू होणार आहे. सिनेमा हॉल सुरू होणार असले तरी तेथील फुड कोर्ट आणि फूड स्टॉक करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. राज्य सरकारकडून सांगण्यात आलेल्या इतर उपाययोजना करणे तसेच मास्क परिधान करणं आणि सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळणं बंधनकारक राहणार आहे.