‘लॉकडाऊन’मुळं बंदी असलेल्या रस्त्यानं जात होते लोक, ‘बॉम्बस्फोटा’त 3 जण जागीच ठार

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   लॉकडाऊनमध्ये जैसलमेरच्या पोखरण गोळीबार रेंजमध्ये बनविलेल्या कच्च्या रस्त्याने बुधवारी रात्री उशिरा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चारा भरत काही लोक बाहेर येत होते. वाटेत सापडलेल्या लष्कराच्या एक टँक बॉम्बबरोबर त्यांनी छेडछाड करता प्रचंड स्फोट झाला. या स्फोटात तीन जणांच्या चिंध्या उडाल्या. स्फोटाचा आवाज ऐकताच आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना माहिती दिली. यानंतर लष्करी उच्चाधिकारी व रामदेवरा पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय लष्कराच्या पोखरण फायरिंग रेंजमध्ये गोळीबाराचे काम मागील काही दिवसांपासून बंद आहे. यामुळे लॉकडाऊन दरम्यान ग्रामस्थांनी दुसऱ्या भागात जाण्यासाठी अनेक अवैध कच्चे मार्ग शोधून काढले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गांवरुन वाहतूक सुरू होती. बुधवारी रात्री उशिरा टेकरा गावचे 3 तरुण या अवैध मार्गावरून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये चारा भरुन दुसऱ्या गावात जात होते. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसलेल्या या तिन्ही तरुणांना वाटेत एक आपत्तीजनक वस्तू दिसली. ट्रॅक्टर थांबवून या माणसांनी या बॉम्बमध्ये छेडछाड केली, बॉम्ब जोरात फुटला तेव्हा या तिघांच्या चिंध्या उडाल्या आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. असं म्हणतात की बॉम्ब खूप शक्तिशाली होता. कदाचित हे सैन्याच्या टँकचे किंवा बंदुकीचे एम्युशन होते जे कदाचित फायरिंगच्या दरम्यान न फुटता तसेच राहिले असेल.

सांगितले जात आहे की मृतक हे मेघवाल जातीचे असून ते टेकरा गावचे रहिवासी आहेत. मृतकांची ओळख मगा राम मेघवाल (35), पुरा राम मेघवाल (30) आणि फगा राम मेघवाल (18) टेकरा गांव, जोधपुर जिल्ह्यातील रहिवासी म्हणून झाली. हे डेलासर येथून चारा भरून आपल्या गावी टेकरा येथे जात होते. या घटनेची पुष्टी देताना पोलिस अधीक्षक किरण कंग म्हणाले की, पोखरण रेंजमध्ये बॉम्बस्फोटामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये जाणाऱ्या 3 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. लष्करालाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.