‘लॉकडाऊन’मुळं बिग बॉसची स्पर्धक शहनाज गिल हॉटेलमध्येच अकडली !

पोलीसनामा ऑनलाईन :बिग बॉस 13 मध्ये आपल्या अदांनी धुमाकूळ घालणारी स्पर्धक शहनाज गिल लॉकडाऊनमध्ये आता एका हॉटेलमध्ये फसली आहे. बिग बॉसनंतर ती तिचा पहिला टीव्ही शो मुझसे शादी करोगे सुरू झाला होता. यानंतर ती मुंबईमध्येच शुट करत होती. शो बंद झाल्यानंतर तिला सिद्धार्थ शुक्लासोबतच्या व्हिडीओ साँगची ऑफर आली. यामुळं ती सतत व्यस्त होती.

या सगळ्यानंतर शहनाज घरी जाण्याचा विचारच करत होती. परंतु देशात कोरोनाचा प्रकोप वाढला आणि 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. अशात तिच्या वडिलांची प्रतिक्रिया आली आहे की, ते त्यांच्या मुलीला खूप मिस करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहनाज घरी गेलेली नाही. आधीच 4 महिने बिग बॉस, नंतर 2 महिने मुझसे शादी करोगे आणि आता लॉकडाऊन अशा सगळ्यामुळं ती दीर्घकाळ घरापासून दूर आहे.

View this post on Instagram

#shehnaazians ❤️

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill) on

जेव्हा शो चालू होता तेव्हा शहनाज शोमध्ये दिसत होती. आता लॉकडाऊनमुळं मात्र ती हॉटेलच्या रूममध्ये बंद आहे. हॉटेलमध्ये तिच्या सोबत तिचा भाऊ शाहबाजही आहे. कारण तोदेखील मुझसे शादी करोगेमध्ये आला होता.

View this post on Instagram

💫

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like