Loksabha 2019 : शिवसेनेच्या ‘त्या’ जागेसाठी भाजपची ‘फिल्डींग’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणाऱ्या मराठवाड्यात सध्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांसमोर पेच निर्माण झाला आहे. जालना मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडणूक लढवण्यास तयार आहेत. खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गाळ घातली आहे. तर हिंगोली मतदार संघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने ‘फिल्डींग’ लावण्यास सुरुवात केली आहे. यावरुन आगामी निवडणूकीत मराठवाडा विभाग दोन्ही पक्षांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

हिंगोली मतदार संघामध्ये २०१४ साली शिवसेनेला पराभव पत्कारावा लागला होता. यानंतर युती होणार नाही असा अंदाज बांधून शिवाजी माने, अँड. शिवाजी जाधव आणि शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुभाष वानखेडे हे २०१४ च्या निवडणूकीत १६३२ मतांनी परभूत झाले होते. तर अँड. शिवाजी जाधव यांना भाजपने उमेदवारीचे गाजर दाखवले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात युती झाल्याने अँड. जाधव यांच्यासह शिवाजी माने, सुभाष वानखेडे यांची गोची झाली आहे.

शिवसेनेच्या ताब्यात असणारा हिंगोली मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. या मतदार संघातून माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा आणि आमदार हेमंत पाटील यांच्यामध्ये चढाओढ आहे. या ठिकाणच्या उमेदवारीसाठी शिवसेनमध्ये खलबते सुरु आहेत. तर इतर पक्षांना हाताशी धरुन भाजपचे पधाधिकारी हिंगोली मतदार संघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नात भाजपला यश आले तर शिवसेनेचा गड असलेला हिंगोली मतदार संघ भाजपला मिळू शकतो. मात्र, त्या बदल्यात कोणता मतदार संघ शिवसेनेला द्यायचा असा पेच भाजपसमोर निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘हा’ पक्ष राज्यातील पूर्ण 48 जागा लढवणार ; काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांची मोठी गोची
जंक फूडमुळे शारीरीक, मानसिक आरोग्य धोक्यात