सेना-भाजपच्या ‘त्या’ मेसेजमुळे नाशिकमध्ये खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना-भाजपा नेत्यांच्या नावाने नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी आघाडीचे उमेदवार समीर भूजबळ यांना विजयी करा असे मेसेज फिरत आहेत. हा प्रकार समोर येताच शिवसेना-भाजप नेत्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. याचदरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना उज्वल भविष्यासाठी विजयी करा असे मेसेज फिरत आहेत. विशेष म्हणजे हे मेसेज शिवसेना-भाजपा नेत्यांच्या नावाने फिरत आहेत BW-NASHIK या अकाऊंटवरून हे मेसेज पाठवण्यात येत आहेत. दरम्यान हा सर्व प्रकार लक्षत येताच शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि पालिकेची विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी या संदर्भात पोलीस आयुक्तांना तक्रार दिली आहे. याचबरोबर, सिन्नरचे शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

विशेष म्हणजे, मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असतांना असा प्रकार घडला आहे ज्याने नाशिक मध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. या मेसेज ने संपूर्ण राजकीय वातावरण बदलू शकते. त्यामुळे हा प्रकार कोणी केला आणि यामागे कोणाचा हात आहे हे शोधण्यासाठी पोलिसांचा सायबर सेल कामाला लागला आहे. अधिक तपस पोलीस करत आहेत.