साध्वी प्रज्ञाची पीडा समजून घ्यायला हवी ; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ‘साध्वीची पीडा समजून घ्याला हवी से वक्तव्य केले आहे’. यापूर्वी ‘व्यक्तिगत त्रास झाल्यामुळे प्रज्ञासिंह तसे बोलल्या’ असा दावा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला होता. ‘ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचे प्रतिक आहे. आणि ते काँग्रेसला महागात पडणार’ असे पंतप्रधान एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘ज्याप्रकारे एका महिलेला यातना देण्यात आल्या, तिची प्रतारणा करण्यात आली… ते कोणत्याही कायद्यात बसत नाही. साध्वीची भावना-पीडा तुम्ही समजून घ्यायला हवी… ठिक आहे, २६/११ च्या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले पण त्यांचं नाव नेहमीच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीत चर्चेत राहिलं… परंतु, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहीत यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याची किंमत चुकवावी लागली’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केलीय.

साध्वी प्रज्ञासिंह यांना निवडणूक आयोगाची नोटीस

शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या संतापजनक वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरवर निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना नोटीस पाठवली असून एका दिवासाच्या आत स्पष्टीकरण मागितलं आहे.

‘माझ्या शापामुळे हेमंत करकरे यांचा सर्वनाश झाला. ज्या दिवशी मी गेले होते. त्याचं सुतक लागलं होतं. आणि ठिक सव्वा महिन्याने ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारली त्या दिवशी त्याचा अंत झाला’. असं संतापजनक विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळे देशभर संताप व्यक्त केला जात होता. आयपीएस असोसिएशनने याचा तीव्र निषेध केला होता. तर राजकिय आणि सामाजिक वर्तूळातून यावर तीव्र निषेध व्यक्त केला जात होता.

साध्वी प्रज्ञासिंह या भोपाळमधून भाजप पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भोपळच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला साध्वी प्रज्ञासिंह यांनी एका दिवसाच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.