मी तुम्हाला एक क्विंटलपेक्षा जास्त वजनाची वाटते का? : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मी काय तुम्हाला एक क्विंटलपेक्षा अधिक वजनाची वाटते का? असे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हंटलं आहे. अमेठीत प्रियंका गांधी यांची ‘लाडू तुला’ करण्यात येणार होती. दरम्यान, ‘लाडू तुला’ करण्यासाठी तराजू आणण्यात आला होता. त्यावेळी तराजूला पाहताच कार्यकर्त्यांची त्यांनी फिरकी घेतली.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान, सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान बुधवारी उशिरा रात्री प्रियंका अमेठीत दाखल झाल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची लाडूने तुला करण्याचे ठरवले होते. त्यासाठी प्रियंका यांचे वजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाडू आणले गेले होते. त्यावेळी सर्वांनी प्रियंका यांना तराजूमध्ये बसण्याची विनंती केली. त्यावर तराजूला पाहताच मी काय तुम्हाला एक क्विंटल पेक्षा अधिक वजनाची वाटते का? असा टोला कार्यकर्त्यांना प्रियंका गांधींनी लगावला. यावेळी तला करण्यासाठीची कार्यकर्त्यांची विनंती प्रियंका गांधी यांनी नाकारली आणि तेथील स्थानिक नेत्याची तुला करून लाडूचे वाटप करण्यात आले.

इतकेच नव्हे तर, प्रियंका गांधी यांना या दौऱ्यात लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान, पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूकीच्या मैदानात उतरू असे त्यांनी म्हंटले. याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूकही देश वाचविण्यासाठीची निवडणूक आहे असेही त्यांनी म्हंटले.

Loading...
You might also like