देशात एका पक्षाची सत्ता येणार नाही, पण… ; संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जे चित्र माझ्यासमोर येत आहे. त्यावरुन देशात एका पार्टीची सत्ता आता येणार नाही. परंतु, पुढचे सरकार हे एनडीएचे असणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले, पुढचे सरकार हे नक्कीच एनडीएचे सरकार असेल आणि या एनडीएची शिवसेना घटक पक्ष आहे. एनडीए चे सरकार होणार हे आतापर्यंतच्या मतदानावरुन दिसून येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला संपूर्ण बहुमत मिळाले होते. त्यानंतर भाजपने त्यांचे एनडीएतील घटक पक्ष शिवसेना, अकाली दल यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पुढे साडेचार वर्षे शिवसेना सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपला आपले मुखपत्र सामना मधून लक्ष्य करीत होते. निवडणुकीच्या अगोदर भाजप व शिवसेनेत पुन्हा युती झाली. मात्र, संजय राऊत यांनी गेल्या वेळीप्रमाणे भाजपला बहुमत मिळणार नाही, असे सांगत एनडीएचे सरकार बनेल, असे सांगून शिवसेनेकडे दुर्लक्ष करु नका असा एकप्रकारे इशारा दिला असल्याचे मानले जात आहे.