‘या’ जिल्ह्यातील दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

तब्बल अडीच हजार मतदारांनी केले नाही मतदान

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्यातील आज मतदान झाले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, देशात पहिल्या टप्प्यातील मतदान आज पूर्ण झालेले आहे, यादरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी  आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.  मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी दोन्ही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.  तब्बल अडीच हजार मतदारांनी मतदान केले नाही.

विशेष म्हणजे, दोन्ही गावाच्या दरम्यान वैनगंगाचे मोठे पात्र आहे. नदी पात्रावर पूल बांधण्याची मागणी या गावांनी अनेक वर्षांपासून केली आहे. मात्र याकडे शासनाने व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्याने ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकला असल्याचे समोर आले आहे.

इतकेच नव्हे तर, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी  गावकऱ्यांनी मतदान करावे, यासाठी प्रयत्न  केला मात्र गावकर्यांनी मतदान केलेच नाही. असेही समोर आले आहे.

Loading...
You might also like