सत्तापरिवर्तन हाच राष्ट्रवादीला ‘घरचा आहेर’ देणार : उदयनराजे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे पक्षाला अडचणीत आणता. तुम्ही अनेकदा पक्षाला घरचा आहेर देता, आता यानंतर तुम्ही पक्षाला कोणता घरचा आहेर देणार असे विचारले असता उदयनराजे यांनी देशात सत्तांतर हाच आपल्या पक्षाला घरचा आहेर असेल असे सांगितल.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे भोसले बोलत होते. देशातील स्थिती सध्या गंभीर झालेली आहे. सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या स्थितीतून देशात बाहेर काढण्यासाठी सत्तांतर आवश्यक आहे. सत्तांतर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून सत्तांतर करणे हाच आपण राष्ट्रवादीला घरचा आहेर देणार असल्याचे सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपचे सर्वच नेते स्वत:ला चौकीदार म्हणवतात, यावर बोलताना म्हणाले की जे चौकीदार म्हणवतात, त्यांना केंद्र सरकारकडून काही पगार, मानधन मिळते का ? तस काही असेल तर मी पण बघतो. असे म्हणत भाजपच्या ‘मै भी चौकीदार’ मोहिमेची खिल्ली उडवली.

दरम्यान सोशल मडियावर प्रसिद्ध असलेले उदयनराजे यांची इतर नेत्यांप्रमाणे आयटी सेल आहे, असं विचारण्यात आले. त्यावर उदयनराजे यांनी आश्चर्यचकित उत्तर देताना म्हटले की, मी स्वत: साधा मोबाईल वापरतो. आपण व्हाट्सअॅप देखील वापरत नसल्याचे म्हटले.