Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्रातील भाजपा उमेदवार लवकरच ठरणार, चर्चेसाठी नेते दिल्लीला रवाना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत काल भाजपा नेते (BJP Leader) अमित शाह (Amit Shah) यांनी घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांशी काल येथे चर्चा केली. या चर्चेत जागावाटपावर निर्णय झाल्याची शक्यता आहे. त्यामुळेच आज भाजपा नेते पुढील चर्चेसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. (Lok Sabha Election 2024)

या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि प्रवीण दरेकर यांचा समावेश आहे. एकुणच वेगवान हालचाली पाहता लवकरच राज्यातील भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते.

महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब करून महाराष्ट्रातील भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या निश्चिती आज होऊ शकते. यासाठी भाजपा नेते दिल्लीला रवाना झाल्याचे बोलले जात आहे.

अमित शाह यांच्या उपस्थितीत मागील दोन दिवसांपासून मित्रपक्षांसोबत वाटाघाटी झाल्या. यावेळी अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यामध्ये जागावाटपावर अंतिम चर्चा झाल्याची शक्यता आहे.

आता भाजपा नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजपा प्रदेश कोअर कमिटीची दिल्लीत बैठक होत असून
या बैठकीत राज्यातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Maha Vikas Aghadi Meeting | मविआची बैठक सकारात्मक, प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावर हास्य! पुढील बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय

Indrani Balan Foundation | भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान (Video)

माथाडीच्या नावाखाली पैशांची मागणी करणार्‍यांवर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून कारवाई

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून नियमभंग करणार्‍या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई

MP Supriya Sule | संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या बाजूने, म्हणाल्या ”हे सगळे बहिणीसाठी….”

Amit Shah On Sharad Pawar | अमित शहांचे टीकास्त्र, अवघा महाराष्ट्र ५० वर्षापासून शरद पवारांचं ओझं वाहतोय, त्या…