Lok Sabha Election In Maharashtra | यंदाच्या निवडणुकीत कोकणातून ‘धनुष्यबाण’ तर साताऱ्यातून ‘घड्याळ’ हद्दपार, जाणून घ्या या निवडणूकीतील 10 मोठ्या राजकीय घटना

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lok Sabha Election In Maharashtra | महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होत असून ही निवडणूक आगळी वेगळी ठरणारी असणार आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. राज्यातील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडल्याने राजकीय समिकरण तयार झाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक गट भाजपसोबत (BJP) सत्तेत आणि दुसरा गट काँग्रेससोबत (Congress) विरोधात आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका गटाला ‘तुतारी’ (Tutari) आणि शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला ‘मशाल’ (Mashal) चिन्ह मिळालं. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सुपुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पहिल्यांदाच ‘मशाल’ हे नवीन चिन्ह तर राष्ट्रवादीची स्थापना करणाऱ्या शरद पवारांना (Sharad Pawar) ‘तुतारी’ या नवीन चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे.(Lok Sabha Election In Maharashtra)

कोकणातून ‘धनुष्यबाण’ हद्दपार

ADV

कोकणातील जागेवरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर भाजपच्या नारायण राणे यांना दोन दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाची. कारण पहिल्यांदा तळ कोकणात शिवसैनिक हे धनुष्यबाणावर नाही तर भाजपच्या कमळ (Kamal) चिन्हावर मतदान करणार आहेत. त्यामुळे मागील वीस वर्षांची धनुष्यबाणावर मतदान करण्याची परंपरा यंदाच्या निवडणुकीत खंडीत होणार आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्गच्या (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) जागेसाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उदय सामंत (Uday Samant) यांनी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र, महायुतीत (Mahayuti) हा मतदारसंघ भाजपकडे तर रायगड लोकसभा मतदारसंघ (Raigad Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण हे चिन्ह यंदा मतदान यंत्रावर दिसणार नाही.

साताऱ्यातून ‘घड्याळ’ हद्दपार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ अजित पवार गटाला देण्यात आले. तर शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाले. साताऱ्याची (Satara Lok Sabha) जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने त्याठिकाणी भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली गेली. मात्र, यंदा याठिकाणी शरद पवार गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असून या निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्ह मतदान यंत्रावर पाहायला मिळणार नाही.

यंदा पहिल्यांदाच घडल्या या 10 घटना

  1. 20 वर्षानंतर पहिल्यांदा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये धनुष्यबाण मतदान यंत्रावर नसणार आहे.
  2. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा सातारा आणि भंडारा गोंदिया मतदारसंघातून (Bhandara Gondiya Lok Sabha) घड्याळ चिन्ह हद्दपार झालं.
  3. ठाकरे कुटुंबीय पहिल्यांदा धनुष्यबाण चिन्हाव्यतिरिक्त इतर चिन्हावर मतदान करणार.
  4. भिवंडीतून (Bhiwandi Lok Sabha) पहिल्यांदा काँग्रेसचा पंजा हद्दपार होणार.
  5. शिवसेना पहिल्यांदा 20 पेक्षा कमी जागांवर लढणार आहे.
  6. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वर्ध्यातून (Wardha Lok Sabha) काँग्रेसचा पंजा (Panja) गायब होणार. यवतमाळ वाशिम मध्ये काँग्रेसचा उमेदवार नसेल.
  7. परभणी मतदारसंघात (Parbhani Lok Sabha) 35 वर्षानंतर धनुष्यबाण चिन्ह गायब.
  8. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम मधून काँग्रेसचं चिन्ह गायब होणार
  9. राज्यातील प्रमुख पक्षांकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही.
  10. वीस वर्षानंतर पहिल्यांदाच अमरावतीत (Amravati Lok Sabha) काँग्रेसचा पंजा मतदान यंत्रावर असेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘पूर्वी आम्ही घास घास घासायचो, इकडे आलो तर…’, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

Amol Kolhe On Ajit Pawar | 23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका – डॉ. अमोल कोल्हे (Video)

Minor Girl Rape Case Pune | पुणे : मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Dr Ajay Taware-Sassoon Hospital | ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात अधीक्षक डॉ. अजय तावरेंची उचलबांगडी, तिघांना कारणे दाखवा नोटीस

Vijay Shivtare-Ajit Pawar | शिवतारेंच्या ‘पलटी’ची राज्यात चर्चा, आधी दिली अजित पवारांच्या पराभवाची गॅरंटी, आता म्हणाले ”ते तर कार्यसम्राट!”