Lok Sabha Election In Maharashtra | महायुतीत 11 लोकसभा जागांबाबत अजूनही पेच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lok Sabha Election In Maharashtra | 11 लोकसभा जागांचा निर्णय भाजप-शिंदे गट शिवसेना-अजित पवार गट महायुतीला (Mahayuti) अजूनही करता आलेला नाही. त्यामुळे या स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते अस्वस्थ असून तिन्ही पक्षांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उत्तर-मध्य मुंबईतून भाजपतर्फे विद्यमान खासदार पूनम महाजन की मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हा निर्णय करता आलेला नाही. उत्तर-पश्चिम मुंबईची जागा भाजपची की शिंदे शिवसेनेकडे हा प्रश्न सुटलेला नाही. दक्षिण मुंबईची जागा मनसेला जागा द्यायची, भाजपने लढायची की शिंदेसेनेला द्यायची हेही ठरत नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटाचा या जागेवर हक्क असल्याचा दावा केला आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत तेच उमेदवार असतील असे दाखवून दिले. नाशिक मध्ये महायुतीसाठी डोकेदुखीचा विषय झाला असून भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट या तिघांच्याही दावेदारीने पेच कायम आहे.

ठाणे मतदारसंघात जागेवर भाजप अड असून तिथे शिंदेगटाचा दावा कायम आहे.
कल्याण मध्ये विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात अडचणी येत आहेत.
पालघर मध्ये शिंदे गटाच्या जागेवर भाजपनेही दावा सांगितला आहे.
छत्रपती संभाजी नगर मध्ये भाजप व शिंदेसेनेत रस्सीखेच आहे.
धाराशिव मध्ये भाजप आणि अजित पवार गटालाही ही जागा हवी असून सातारा भाजपकडे जाणार
हे स्पष्ट असले तरी अधिकृत जाहीर झालेले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक