लोकसभा निवडणूक 2019 : रमजानदरम्यान येणाऱ्या मतदानाबद्दल ओवेसींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रमजान महिन्यातील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला घेऊन वादंग सुरु आहे. यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा संपूर्ण वादविवाद अनावश्यक आहे. मी राजकीय पक्षांना विनयशीलपणे विनंती करतो की मुस्लिम समाजाचा आणि रमजानचा तुमच्या कोणत्याही कारणासाठी वापर करु नये. इतकेच नाही तर, या महिन्यात उलट मतदानाचे प्रमाण वाढेल असे वक्तव्य त्यांनी केले.

रमजानदरम्यान मतदानावर ओवेसी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “हा संपूर्ण वादविवाद अनावश्यक आहे. मी सर्व राजकीय पक्षांना विनयशीलतेने विनंती करतो की, मुस्लिम समाजाचा किंवा रमजानचा कोणत्याही कारणासाठी वापर करू नये.” असे म्हणत त्यांनी पक्षांना विनंती केली आहे.

पुढे बोलताना ओवेसी म्हणतात की, “मुस्लिम नक्कीच रमजानमध्ये उपवास करतील, ते बाहेर जातील आणि सामान्य आयुष्य जगतील, ते कार्यालयात जातील, गरीबांच्या अगदी गरीबांपैकीहीसुद्धा उपवास करतात. माझे निरीक्षण असे आहे की, या महिन्यात (रमजान) मतदानाची टक्केवारी अधिक असेल कारण सर्वजण आपल्या दैनंदिन कर्तव्यांपासून मुक्तही असतील. त्यामुळे नक्कीच मतदानाची टक्केवारी वाढेल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या कालावधीत 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान केले जाईल. बहुसंख्य जागा उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील असतील. अशा प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांवर काही लोकांनी राग व्यक्त केला आहे.

आम आदमी पार्टीचे अमानतुल्लाह खान यांनी रमजान दरम्यानच्या मतदानावरील मुद्द्यावर ट्विट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “12 मे रोजी दिल्लीतील रमजानचा दिवस असेल ; मुस्लिम कमी मतदान करतील, त्याचा थेट फायदा भाजपाला मिळेल.” तर दुसरीकडे टीएमसी नेते फरहाद हकीम यांनी साशंकतेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “अल्पसंख्यांकांनी मतदान करू नये अशी भाजपाची इच्छा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची काळजी घ्यावी.”

दरम्यान, निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणूक 2019च्या तारखेची घोषणा केली. याअंतर्गत, यावेळी 543 जागांसाठी 7 टप्प्यात निवडणुका होतील. पहिला टप्पा 11 एप्रिलला होणार आहे. तर याची मतमोजणी ही 23 मे राेजी होणार आहे.

ह्याही बातम्या वाचा –

खुशखबर…! सोन्या-चांदीच्या दरात घट

लोकसभा निवडणुकीत गाजणार ‘हे’ सहा मुद्दे

‘ते’ एकत्र आले आणि मी ‘आठवले’ असतानाही मला ते विसरले

अखेर मनसेच्या एकमेव आमदारानेही बांधले शिवबंधन

प्रकाश आंबेडकरांनी सांगितले शरद पवारांच्या माघारीचे ‘खरं’ कारण