‘या’ तारखेला ठरणार महाआघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ; शरद पवारांसह ‘हे’ नेते असणार उपस्थित ?

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या २१ मे रोजी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी दिल्लीत बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

२९ एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपली आहे. मात्र देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. येत्या ६ मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, भाजपकडून विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? या प्रश्नावरून विरोधकांना टार्गेट करण्यात येत आहे. त्यामुळे, येत्या २१ मे रोजी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी दिल्लीत बैठक होणार आहे. महाआघाडीच्या या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. असे तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले आहे.

तसेच महाआघाडीच्या या बैठकीत बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत, ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.’ यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात असे वक्तव्य त्यांनी केले होते.