दक्षिण नगरमध्ये सु’जय’ चा ‘विजय’ ; जाणून घ्या विधानसभा निहाय मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने पुन्हा एकदा देशभरात मोदींची लाट आली असून महाराष्ट्रा प्रमाणे देशातील इतरभागांमध्ये देखील भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येत आहेत. राज्यात ४८ जागांपैकी युतीला ४१ जागा मिळाल्या आहेत. त्यात अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी अहमदनगर मतदार संघात विजयाचा झेंडा फडकावला आहे.

अहमदनगर मतदार संघात भाजपकडून डॉ. सुजय विखे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांच्यात थेट लढत होती. या लढतीत डॉ. सुजय विखे यांनी तब्बल २ लाख ८१ हजार ४७४ मतांनी विजयी झाले.

भाजपचे डॉ. सुजय विखे यांना ७ लाख ४ हजार ६६० मते पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांना ४ लाख २३हजार १८६ मते मिळाली अहमदनगर लोकसभा मतदार संघात यंदा ६४.२६ टक्के मतदान झाले होते .

अहमदनगर लोकसभा मतदार संघ
एकूण मतदार – १८५४२४८
एकूण मतदान – ६४.२६ %
विजयी उमेदवार – डॉ सुजय विखे ( भाजप )
मिळालेली मते – ७ लाख ४ हजार ६६०

डॉ. सुजय विखे आणि संग्राम जगताप यांना कुठून किती मतं ?

१) कर्जत -जामखेड
सुजय विखे – १०५२३६
संग्राम जगताप – ८०५६३

२) श्रीगोंदा
सुजय विखे– १०९१०३
संग्राम जगताप – ७८५११

३) नगर
सुजय विखे– १०८८६०
संग्राम जगताप –५५,७३८

४) पारनेर
सुजय विखे –११७०८१
संग्राम जगताप –८०३७७२

५) राहुरी
सुजय विखे– १२६७१३
संग्राम जगताप –५४९१०

६) शेवगाव –पाथर्डी
सुजय विखे– १२९९६८
संग्राम जगताप –६९२७०