home page top 1

भाजप महिला उमेदवाराबद्दल काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे अपशब्द

भोपाळ :  वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा जवळ आला असून नेत्यांमध्ये प्रचाराचा चांगलाच जोर वाढला आहे. प्रचाराच्या सभेत बोलण्याच्या ओघात नेत्यांची जीभ घसरत आहे. तर काहीजण वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. प्रचारात बेताल वक्तव्य करणे हे काँग्रेस नेत्यांची सवयच बनली आहे. काँग्रेसचे उमेदवार माजी विरोधी पक्ष नेते अजय सिंह यांनी भाजपाच्या महिला खासदाराबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. भाजपा उमेदवार आणि विद्यमान खासदार रीती पाठक यांच्याबद्दल बोलताना सिंह यांची जीभ घसरली.

नुक्कड येथील प्रचारसभेत अजय सिंह यांनी रीती पाठक यांच्यावर शाब्दीक हल्ला केला. अजय सिंह यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, रीती पाठक यांना गेल्या निवडणुकीत भाजपने तिकीट दिले. त्यावेळी मोदी लाट होती, प्रत्येकजण १५ लाख मिळतील या आशेने मोदींच्या पाठीशी होते. मात्र, रीती पाठक या मतदारसंघात फिरकल्याच नाहीत. तसेच त्यांनी खासदार निधीतून कोणतीही कामे केली नाहीत, भैय्या वो ठीक माल नही, असे म्हणत सिंह यांनी रीती यांना चक्क माल असे संबोधले. सिंह यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, अजयसिंह यांच्या या वक्तव्यावरून रीती पाठक यांनी अजयसिंह यांना प्रत्युत्तर दिले आहे. अजय सिंह यांना माता-भगिनींचा सन्मान करता येत नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

Loading...
You might also like