#Loksabha Election 2019 : पुण्यात गिरीश बापट Vs प्रविण गायकवाड यांच्यात ‘सामना’ रंगणार

पुणे : NP NEWS NETWORK – पुण्यात पालकमंत्री गिरीष बापट आणि प्रविण गायकवाड यांच्यात लोकसभेसाठी चुरशीची लढत रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून गिरीष बापट यांना तर काँग्रेसकडून प्रविण गायकवाड यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती दोन्ही पक्षाकडून दिल्लीतील खात्रीलायक सूत्रांनी पोलीसनामा ऑनलाइनला आज (शुक्रवारी) दिली आहे. एवढेच नव्हे तर आगामी ३ ते ४ दिवसाच्या आत दोन्ही पक्ष्याकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीष बापट यांना मुख्यमंत्र्यांनी कामाला लागा अशा सुचना दिल्या आहेत.

काँग्रेसकडून राज्यातील पाच मतदारसंघांसाठी उमेदवार घोषीत करण्यात आले आहेत तर पुण्याच्या जागेबाबात अद्याप घोषणा करण्यात आली नाही. मागील अनेक दिवसांपासून पुण्यातून लोकसभेसाठी कॉंग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी दिग्गजांनी लॉबिंग सुरु केली होती. प्रत्येकजण आपली ताकद लावून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु या सगळ्यांना बाजूला सारून संभाजी ब्रिगेडमध्ये अनेक वर्षांपासून काम करणारे प्रविण गायकवाड यांना पुणे लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचे काँग्रेसने निश्चित केले आहे. भाजपकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आलेली नाही. परंतु राज्यातील सर्व उमेदवारांबाबत निर्णय पुर्ण झाले आहेत. केवळ घोषणा बाकी आहे. जनभावनेचा विचार करून राज्यात तगडे उमेदवार देण्यावर भाजपचा भर आहे. पुण्यातून पालकमंत्री व अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांच्या नावावर भाजपमध्ये शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गिरीष बापट यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे कालच सांगितले होते. आता मुख्यमंत्र्‍यांनीच त्यांना कामाला लागा अशी सुचना दिली आहे. पुण्यात लोकसभेसाठी गिरीष बापट आणि प्रविण गायकवाड यांच्यात लोकसभेसाठी ‘सामना’ रंगणार आहे.