मावळात पार्थ ‘मावळला’ : ‘रेकॉर्ड ब्रेक’ पार्थ अजित पवार पराभवाच्या छायेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची निवडणुक असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे १ लाख मतांनी पिछाडीवर आहेत. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी १ लाख मतांचा लिड घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी दिल्याने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे.

पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंबीयांनी मावळ पिंजून काढला होता. अजित पवार यांनी मावळामध्ये तळ ठोकून राहिले होते. मात्र, याचा परिणाम होताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर पहिल्यादा पार्थ पवार हे काही मतांनी पुढे होते. मात्र, श्रीरंग बारणे यांनी पुन्हा एकदा मुसंडी मारली असुन आता श्रीरंग बारणे हे तब्बल १लाख मतांनी पुढे आहेत. पार्थ पवार पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा मतमोजणीच्या ठिकाणी सुरू आहे.

मावळात पार्थ ‘मावळला’
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद पवार यांचे नातु पार्थ अजित पवार हे तब्बल १ लाख मतांनी पिछाडीवर आहेत. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांना पिछाडीवर टाकले आहे. पार्थ पवार पिछाडीवर गेल्याने राष्ट्रवादी कॉग्रेससह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्‍का बसला आहे. तर मतमोजीणीच्या ठिकाणी मावळात पार्थ ‘मावळला’ अशी चर्चा सुरू झाली आहे.